बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याच्या हटके चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपुर मनोरंज केलं आहे, पण सध्या त्याच्या प्रकृतीबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं ही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

अभिनेत्याच्या खांद्यालाही फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. सैफसोबत त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील रुग्णालयात आहे. सैफच्या गुढग्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याल रुग्णालयात दाखल करावे लागले असल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

आणखी वाचा : रामायणावर बेतलेल्या ‘या’ जपानी चित्रपटावर भारतात घातलेली बंदी; नेमकं कारण जाणून घ्या

‘दैनिक भास्कर’च्या रिपोर्टनुसार सैफचा गूढघा आणि खांदा अशा दोन्हीठिकाणी फ्रॅक्चर झालेलं आहे. सैफच्या या दुखापतीबद्दल अद्याप त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच डॉक्टरांनीही दुखापतीचं नेमकं कारण स्पष्ट न केल्याने याबाबतीत अजूनही संभ्रम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ ‘देवारा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘देवारा’मध्ये सैफ अली खान ज्युनिअर एनटीआरसह झळकणार आहे. या चित्रपटात सैफ ‘भहीरा’ हे पात्र साकारणार आहे. तसेच याबरोबरच या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूरही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. काही खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सैफला दुखापत झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ज्युनिअर एनटीआर, जान्हवी कपूर व सैफ अली खान यांचा हा ‘देवारा’ ५ एप्रिल २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.