बॉलिवूडच्या पॉवर कपल्सपैकी एक असलेले सैफ अली खान आणि करीना कपूर खान मीडिया फोटोग्राफर्समध्ये लोकप्रिय आहेत. जेव्हा करीना आणि सैफ एकत्र बाहेर पडतात तेव्हा प्रत्येकवेळी मीडिया फोटोग्राफर्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करतात. अलीकडेच सैफ-करीना तैमूर आणि जेहबरोबर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करून परतले आणि आता त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अशातच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पण या व्हिडीओमुळे नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.

नुकतेच ते दोघेही मुंबईत एकत्र एकत्र फिरताना दिसले. करीना आणि सैफ आधी करिश्मा कपूरच्या घरी गेले. त्यानंतर दोघेही रणबीर आणि आलियाची मुलगी राहाला भेटायला गेले. पण तिथून परतताना सैफ आणि करीना गाडीत बसले असतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी सैफ आणि करीनाच्या बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

हेही वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

सैफ अली खान आणि करीना कपूर खान रणबीर-आलियाच्या घरातून बाहेर आले आणि गाडीत बसून निघून गेले.यावेळी सैफ अली खान गाडी चालवत होता आणि करीना त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेली. पण सैफ गाडी चालवत असताना त्या दोघांनीही सीट बेल्ट घातला नव्हता. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि व्हिडीओवर कमेंट करत ते “या दोघांनी सीट बेल्ट का घातला नाही?” असं विचारात आहेत.

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमध्ये चूक, माफी मागितल्यावर झाले ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘व्हायरल भयानी’ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सैफ अली खान आणि करीना कपूरचा हा व्हिडीओ शेअर केला. सैफ आणि करीना यांना सीट बेल्टशिवाय कारमध्ये पाहून एका नेटकाऱ्याने लिहिलं की, “हा नियम फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? त्यांच्यासाठी नाही?” दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहीलं, “बॉलिवूडचे लोक सीट बेल्ट घालण्यावर विश्वास ठेवत नाहीत की ते एलियन आहेत?” आणखी एका नेटकाऱ्याने कमेंट केली, “हे लोक सीट बेल्ट घालत नाहीत पण मुंबई पोलीस या लोकांना का पकडत नाहीत?” आता त्यांचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.