scorecardresearch

अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमध्ये चूक, माफी मागितल्यावर झाले ट्रोल

ही चूक जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा बिग बींनी चाहत्यांची माफी मागितली.

अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमध्ये चूक, माफी मागितल्यावर झाले ट्रोल

महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विशेष करून ट्विटरच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. पण आता बिग बींकडून ट्वीट करण्यात एक मोठी चूक झाली आणि त्यासाठी त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली आहे. बिग बींनी माफी मागितल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं होतं. पण त्या ट्वीटमध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली. ही चुक हणजे त्यांनी त्या ट्वीटला चुकीचा नंबर दिला होता. ही चूक जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा बिग बींनी चाहत्यांची माफी मागितली. एक ट्वीट करत त्यांनी लिहिलं, “T4515 मोठी चूक, T 4514 नंतर माझे पूर्वीचे सर्व ट्विट चुकले आहेत. T 5424,5425,5426,4527, 5428, 5429, 5430.. सर्व नंबर चुकीचे आहेत.. ते T4515,4516,4517,4518,4519 4520,452 असायला हवे होते. याबद्दल मी माफी मागतो.”

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

आता यामुळे बिग बींवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. एका यूजरने लिहिले, “सर हे दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला झोप येत नव्हती.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “बाजार उद्या कोसळेल!” तर आणखी एका यूजरने गंमतीत म्हटले की, “सर माफीचे स्पेलिंग चुकीचे आहे. कृपया T4516 मध्ये ते दुरुस्त करा.”

हेही वाचा : “लोकांनी तुझी खिल्ली उडवली पण तू…” लेकाच्या उत्कृष्ट कामगिरीचं अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक

अमिताभ बच्चन नुकतेच ‘गुडबाय’ चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर त्यानंतर आता ते ‘आदिपुरुष’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या व्यतिरिक्त ते प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत ‘प्रोजेक्ट के’मध्येही दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 09:58 IST

संबंधित बातम्या