Saif Ali Khan Attack Updates: सैफ अली खान व करीना कपूर यांच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात गुरुवारी (१६ जानेवारीला) मध्यरात्री एक चोरटा शिरला. तो सैफ व करीनाचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीत गेला होता. तिथे मदतनीसने त्याला पाहिलं. तिने जेहला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून सैफ व करीना खाली आहे, त्यानंतर झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला.

याप्रकरणी दिलेल्या पोलीस तक्रारीत घरातील सर्वात आधी त्या चोरट्याला पाहणारी मदतनीस एलियामा फिलिप (वय ५६) हिने पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. तिने नेमकं काय सांगितलं, ते जाणून घेऊयात.

फिलिपने पोलिसांना काय सांगितलं?

१५ जानेवारीला रात्री ११ वाजता मी सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीर उर्फ ​​जयबाबा (वय 4 वर्षे) त्याला जेवण भरवलं आणि झोपवलं. मग मी आणि माझी सहकारी रात्री तिथेच थांबलो.

हेही वाचा – Saif Ali Khan: दरोडेखोराने १ कोटी रुपये मागितले, सैफ अली खानच्या घरातील मदतनीसची पोलीस जबाबात माहिती

साधारण मध्यरात्री २ वाजता आवाजामुळे मला जाग आली आणि मी उठून बसले. बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाइट चालू होते. करीना मॅडम जेह बाबांना बघायला आल्या आहेत असं मला वाटलं. त्यामुळे मी परत झोपले, पण मला अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे मी उठले आणि बाथरूममध्ये कोण आहे हे बघायला डोकावून पाहिलं, तेव्हा आतून एक व्यक्ती बाहेर आली आणि जेहच्या पलंगाकडे निघाली. घाबरून मी पटकन जेहजवळ गेले. त्यानंतर हल्लेखोराने माझ्याकडे हातवारे करून “कोणताही आवाज करू नको” असं म्हणाला. त्याचवेळी जेहची नॅनी जुनू जागी झाली. त्याने तिलाही आवाज न करण्याचा इशारा केला. त्याने डाव्या हातात एक काठी धरली होती आणि त्याच्या उजव्या हातात एक लांब, पातळ ब्लेडसारखी वस्तू होती.

हेही वाचा – चोराने सैफवर हल्ला केल्यावर ‘हे’ दोघे पोहोचले मदतीला; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात

मी जेहला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझ्यावर ब्लेडने हल्ला केला, माझ्या दोन्ही हातांना दुखापत झाली. मग मी त्याला विचारलं, “तुला काय हवं आहे? किती पैसे हवे आहेत?”. तो म्हणाला, “एक कोटी रुपये”. हा गोंधळ ऐकून करीना मॅडम धावत रुममध्ये आल्या. सैफ सरांनी त्याला विचारलं, “तू कोण आहेस? तुला काय हवंय”. त्यानंतर त्या व्यक्तीने सैफ सर यांच्यावर काठी आणि त्या धारदार वस्तूने वार केले.

गीता नावाच्या या नर्सवरही त्या व्यक्तीने हल्ला केला. आम्ही घाईघाईने खोलीतून बाहेर पडलो आणि वरच्या मजल्यावर पळून जाण्यापूर्वी दरवाजा लॉक केला. आमच्या आवाजाने घरातील इतर कर्मचाऱ्यांना जाग आली आणि मग आम्ही सगळे खाली खोलीत गेलो. मात्र, आम्ही खोलीत परतलो तेव्हा तो माणूस तिथे नव्हता.

हेही वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या

सैफ अली खानला मानेला, उजव्या खांद्यावर, पाठीला, डाव्या मनगटाला आणि मणक्याला दुखापत झाली असून त्यातून रक्तस्त्राव झाला आहे. तर गीताला उजव्या मनगटावर, पाठीला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या.

हल्लेखोर दिसतो कसा?

तो माणूस सावळ्या रंगाचा, सडपातळ बांधा असलेला होता. त्याचं वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावं. त्याची उंची जवळपास ५ फूट ५ इंच होती. त्याने गडद रंगाची पँट व शर्ट घातलं होतं आणि त्याच्या डोक्यावर टोपी होती, असं सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सैफ अली खान सध्या लिलावती रुग्णालयात आहे. त्याच्या मणक्याला जबर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.