Saiyaara Movie Box Office Collection Day 5 entertainment news update : ‘सैयारा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियासह सर्वत्र या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार चौथ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २४.०० कोटींचा गल्ला जमावला होता. पाचव्या दिवसशी या चित्रपटाने किती कलेक्शन केलं जाणून घेऊयात. गेल्या पाच दिवसाचं कलेक्शन पाहता प्रदर्शनानंतरच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३५.७५ कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक कामाई केली होती. आता ‘सैयारा’ने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल २५.०० कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १३२.२५ कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ची क्रेझ कायम असल्याचं दिसतं.

Live Updates

Entertainment News Update

18:58 (IST) 23 Jul 2025

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची वर्णी, स्वत:च्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या भावना; म्हणाला…

Adinath Kothare in Ramayana Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये मराठी अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका, भावना व्यक्त करत म्हणाला; "मोठी जबाबदारी..." ...सविस्तर बातमी
18:12 (IST) 23 Jul 2025

"अशावेळी लोक साथ सोडून जातात, पण त्याने…"; हिना खानने सांगितली तिची प्रेमकहाणी, पती रॉकी जैस्वालबद्दल म्हणाली, "दहा वर्षांपूर्वी…"

Hina Khan Reveals love Story With Husband Rocky Jaiswal : "१० वर्षांपूर्वी भेटलो, कर्करोगातही सोडली नाही साथ...", हिना खानने सांगितली प्रेमकहाणी, म्हणाली... ...सविस्तर वाचा
17:46 (IST) 23 Jul 2025

सलमान खानने त्याच्या घराची बाल्कनी बुलेटप्रूफ का केली? अभिनेता कारण सांगत म्हणाला, "भीतीमुळे नाही तर… "

Salman Khan On His Bulletproof Balcony : सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ...वाचा सविस्तर
16:54 (IST) 23 Jul 2025

‘हे’ चार हॉरर चित्रपट तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाहीत; एकटे पाहण्याची वाटेल भीती

Horror Movies On OTT : आजकाल प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची क्रेझ खूप वाढली आहे. ...वाचा सविस्तर
16:40 (IST) 23 Jul 2025

Video: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का?

Taarak Mehta Ka Ooltah Chashma completes 17 years: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेला झाली १७ वर्षे पूर्ण ...वाचा सविस्तर
16:34 (IST) 23 Jul 2025

"मराठा, भोजपुरी समाज आणि सर्वांनी मिळून मुंबईसाठी…", रवी किशन यांचं वक्तव्य; मराठी-हिंदी वादाबद्दल म्हणाले, "हे राजकारण…"

Ravi Kishan on Marathi Hindi Language Controversy : मराठी-हिंदी वादाबद्दल रवी किशन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ""महानगरपालिकांच्या निवडणुका..." ...वाचा सविस्तर
16:28 (IST) 23 Jul 2025

अभिनेत्याची मराठी मालिकेतून Exit…; आता 'या' हिंदी सिरियलमध्ये घेतली एन्ट्री, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो…

Tumm Se Tumm Tak Hindi Serial : लोकप्रिय मराठी अभिनेते आता हिंदी मालिकेत झळकणार! प्रोमो एकदा पाहाच... ...सविस्तर वाचा
15:38 (IST) 23 Jul 2025

दाक्षिणात्य सुपरस्टारने ५० व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; अभिनेत्याच्या डॅशिंग अंदाजाने वेधलं लक्ष; पाहा व्हिडीओ

Suriya Karuppu Movie Teaser : ५० व्या वाढदिवसानिमित्त सूर्याच्या ‘करुप्पू’चा टीझर प्रदर्शित, अभिनेत्याच्या दुहेरी भूमिका ...वाचा सविस्तर
15:31 (IST) 23 Jul 2025

मानेत ट्यूमरची गाठ, दृष्टी जाण्याची शक्यता अन्…; जॉनी लिव्हर यांच्या मुलाची झालेली 'अशी' झालेली अवस्था; म्हणाले, "डॉक्टरांनी…"

Johny Lever Talks About His Son : जॉनी लिव्हर यांचा मुलगा जेसी लिव्हरला लहान वयात झालेला गंभीर आरोप, म्हणाले... ...वाचा सविस्तर
15:22 (IST) 23 Jul 2025

तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर केलेले गंभीर आरोप; म्हणालेली, "शॉर्ट स्कर्टमध्ये बसायला सांगायचे अन्…"

When Tanushree Dutta accused Vivek Agnihotri of mistreatment : तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्याबरोबर काम करण्याचा तिचा वाईट अनुभव शेअर केला होता. ...सविस्तर बातमी
14:04 (IST) 23 Jul 2025

शाहिद कपूरचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट रद्द, दिग्दर्शकाने दिली माहिती; म्हणाले, "स्वत:ला सिद्ध करूनही…"

शाहिद कपूरचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट सुरू होण्यापूर्वीच थांबवला, दिग्दर्शकाने दिली माहिती ...अधिक वाचा
13:53 (IST) 23 Jul 2025

शिल्पा शिरोडकरला अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळाली 'ही' शिकवण; म्हणाली, "त्यांनी मला वेळेवर…"

शिल्पा शिरोडकर ही ९० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. ...अधिक वाचा
13:38 (IST) 23 Jul 2025

"दादागिरी नाही पण ती सेटवर बॉस...", 'लक्ष्मी निवास' फेम अक्षया देवधर हर्षदा खानविलकर यांच्याबद्दल असं का म्हणाली?

Laxmi Niwas Fame Akshaya Deodhar Talk's About Harshada Khanvilkar : सेटवर हर्षदा खानविलकर यांचा असतो दरारा, 'लक्ष्मी निवास' फेम अक्षया देवधर म्हणाली... ...अधिक वाचा
12:43 (IST) 23 Jul 2025

"मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं…", कडकलक्ष्मीचा नादखुळा! संतोषला चांगलंच सुनावणार, थेट सांगितल्या 'या' चुका, पाहा प्रोमो…

Lakshmi Niwas Promo : 'कडकलक्ष्मी'चा जबरदस्त अंदाज! संतोषच्या चुकांचा पाढाच वाचणार...; मालिकेत काय घडणार, पाहा प्रोमो ...अधिक वाचा
12:38 (IST) 23 Jul 2025

Video: "रमा आणि साई…", अक्षय आणि रमा यांच्यात येणार दुरावा; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, "बास करा…"

Muramba upcoming twist: 'मुरांबा' मालिकेत पुढे काय होणार? मालिकेचा प्रोमो पाहिलात का? ...सविस्तर वाचा
12:03 (IST) 23 Jul 2025

एकेकाळी होता प्रसिद्ध मॉडेल, नंतर श्रीदेवीबरोबर केलेलं काम…; पण 'त्या' दहा सेकंदाच्या सीनमुळे ट्रोल होताच सोडलं बॉलीवूड

एकेकाळी होता प्रसिद्ध मॉडेल, नंतर श्रीदेवीबरोबर केलेलं काम...; पण एका संवादाने संपलं करिअर; जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
11:57 (IST) 23 Jul 2025

'ज्वारीची भाकरी अन्…' जीमला न जाता बोनी कपूर यांनी ६९ व्या वर्षी घटवलं २६ किलो वजन; फोटो पाहून चाहते झाले थक्क

Boney Kapoor Transformation Photos Viral : वयाच्या ६९ व्या वर्षी बोनी कपूर यांचं खतरनाक ट्रान्सफर्मेशन; घटवलं 26 किलो वजन ...सविस्तर वाचा
11:24 (IST) 23 Jul 2025

"माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी ती…", शिल्पा शिरोडकर बहीण नम्रता आणि महेश बाबूबद्दल म्हणाली, "तो त्याच्या कुटुंबाच्या…"

Shilpa Shirodkar on Namrata And Mahesh Babu: "त्याने खूप दु:ख...", बॉलीवूड अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? ...सविस्तर वाचा
11:20 (IST) 23 Jul 2025

"तो मला रक्तानं प्रेमपत्र लिहायचा…", शिल्पा शेट्टीचा खुलासा; म्हणाली, "मी त्याला माझा फोटो…"

shilpa shetty revealed her fan written love letter from blood : शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ...वाचा सविस्तर
09:53 (IST) 23 Jul 2025

"तू पोपटलालशी लग्न करायला पाहिजे होतं", खुशबू तावडेला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्रीने म्हणाली, "खरंतर…"

Khushboo Tawade Talks About TMKOC : खुशबू तावडेला चाहत्याने 'तारक मेहता...',मधील पोपटलालबद्दल विचारला अजब प्रश्न; अभिनेत्री म्हणाली... ...सविस्तर बातमी
09:49 (IST) 23 Jul 2025

मालिकेच्या सेटवरचं LIVE किचन! निवेदिता सराफांनी बनवला 'हा' खास पदार्थ; अभिनेता म्हणाला, "ताईंच्या हातचं…"

Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी मालिकेच्या सेटवर बनवला खास पदार्थ; अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ... ...सविस्तर बातमी
09:25 (IST) 23 Jul 2025

Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'ची बॉक्स ऑफिसवर हवा! पाचव्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, एकूण कमाई ऐकून व्हाल थक्क; जाणून घ्या...

'सैयारा' चित्रपट सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अहान पांडे व अनित पड्डा यांच्या बॉलीवूडमधील पदार्पणातील चित्रपटांने अनेकांची पसंती मिळवली आहे. प्रेक्षकांसह कलाकारही चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवरची आकडेवारी पाहता चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम असल्याची जाणवतं.

Saiyaara Movie Collection Day 5 It has reached the 100 crore mark Know the total collection

'सैयाराचा' पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर डंका कायम (फोटो सौजन्य, इंडियन एक्स्प्रेस)

मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासून चर्चेत होता. चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. यामधील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अहान पांडे व अभिनेत्री अनित पड्डा यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा गाठला आहे.