Salman Khan : कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात हजेरी लावताना प्रत्येक कलाकाराला आधी स्वत:ची तयारी करावी लागते. त्यामध्ये ते स्टेजवर जे काही सादर करणार आहेत, ते सर्व त्यांना लक्षात ठेवावे लागते. फक्त डायलॉग्ज, गाणी व डान्सच्या स्टेप्स एवढेच नाही, तर पोशाख साजेसा आहे की नाही तेसुद्धा पाहावे लागते. अशात सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या ‘दबंग’ टूरमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी तो त्यासाठी कशी तयारी करत आहे हे त्याने मजेशीर अंदाजात सांगितले आहे.

सलमान खान त्याच्या ‘दबंग’ टूर कार्यक्रमासाठी दुबईमध्ये दाखल झाला आहे. सर्व तयारी पूर्ण करून, तो थेट लाइव्ह कॉन्सर्टसाठी सज्ज झाला आहे. त्याला पाहण्यासाठी चाहतेदेखील फार उत्सुक आहेत. अशात शो सुरू होण्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत सलमानने स्टेजवर जाण्याआधीची त्याची तयारी कथन केली आहे.

हेही वाचा : Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”

सलमान खान हसत म्हणाला, “कार्यक्रमात सहभागी होण्याआधी मी सर्वप्रथम माझे कपडे आणि चेन व्यवस्थित आहे का ते तपासतो. मी प्रार्थना करतो की, मला सर्व स्टेप्स लक्षात राहाव्यात आणि मी काही विसरू नये. कार्यक्रमात डान्स सुरू असताना मी काही विसरलोच, तर प्रेक्षकांना ते समजू नये आणि माझा श्वास जड होण्याआधी सर्व काही व्यवस्थित व्हावे, असा विचार मी करत असतो. त्यानुसार आतापर्यंत तरी सर्व काही ठीक आहे.”

सलमान खान या कार्यक्रमासाठी कालच दुबईमध्ये पोहोचला आहे. कार्यक्रम शनिवारी (७ डिसेंबर) आहे. सलग चार तास प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात सलमान ‘बिग बॉस : वीकेंड का वार’मध्ये दिसणार नाही. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्याच्यासह बॉलीवूडच्या काही अभिनेत्री आणि अभिनेतेसुद्धा हजेरी लावणार आहेत. सलमानने शुक्रवारी या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला होता.

प्रोमोमध्ये सलमानची दमदार एन्ट्री आणि त्यानंतर इतर कलाकारांचा डान्स पाहायला मिळत आहे. मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आधीच या शोच्या तिकिटांची ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केली आहे. सलमानच्या या ‘दबंग टूर’मध्ये सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, तमन्ना भाटिया या अभिनेत्री दिसणार आहेत. तसेच सुनील ग्रोवर, मनीष पॉल, आस्था गिल व प्रभु देवा यांचासुद्धा धमाकेदार डान्स यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दुबईत होणाऱ्या या भव्य कार्यक्रमामुळे सलमान खान चर्चेत आहेच. त्याशिवाय त्याची सुरक्षा व्यवस्थासुद्धा त्याच्या चर्चेचं कारण ठरत आहे. कारण- काही दिवसांत त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिलं जात आहे.

हेही वाचा : अर्चन पूरन सिंगने रेखा यांना ‘मिस्ट्री मॅन’बद्दल विचारलेला प्रश्न, मिळालेलं ‘हे’ उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या तो त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठीदेखील वेळ काढत आहे. या बहुचर्चित चित्रपटात त्याच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी हे कलाकारसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.