Salman Khan on his Relationships: अभिनेता सलमान खान हा जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. तो तितकाच त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. अभिनेत्याने लग्न जरी केले नसले तरी आजही त्याच्या रिलेशनशिपविषियीची चर्चा होताना दिसते.

सलमान खानने नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सीझन ३ मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने काही किस्से सांगितले. आज लोकांचे जितक्या रिलेशनशिप असतात, त्या तुलनेने माझ्या रिलेशनशिपची संख्या कमी असल्याचे त्याने म्हटले.

सलमान खान काय म्हणाला?

कपिल शर्मा गमतीत म्हणाला की, तुम्ही गर्लफ्रेंड्सच्या बाबतीत नशीबवान आहात. त्यावर सलमान खान म्हणाला, “ही गोष्ट खरी नाही. आज मी ५९ वर्षांचा आहे; पण आतापर्यंत माझ्या फक्त तीन-चार गर्लफ्रेंड्स होत्या. त्याचा विचार करता, माझी रिलेशनशिप ७-८ वर्षे टिकली. काही १२ वर्षेदेखील होती. आताच्या मुला-मुलींच्या तुलनेत ही सरासरी खूपच कमी आहे. त्यांच्या तुलनेत मी ओल्ड स्कूल आहे. जुन्या पिढीतील आहे. ते खूप लवकर एका नात्यातून दुसऱ्या नात्यामध्ये जातात.”

त्याबरोबरच सलमान खानने आमिर खानबाबतदेखील मत व्यक्त केले. कपिल शर्मा म्हणाला की, नुकतीच आमिर खानने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. त्यावर सलमान खान गमतीत म्हणाला, “आमिर खानची गोष्टच वेगळी आहे. तो परफेक्शनिस्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत तो आता त्याला लग्नाला परफेक्ट बनवत नाही, तोपर्यंत तो थांबणार नाही. पण, मला वाटते की, हे शेवटचे आहे. यावेळी लग्नात त्याला परिपूर्णता मिळेल, याची मला खात्री आहे.”

सलमान खानच्या ३६ वर्षांच्या करिअरमध्ये त्याचे नाव विविध अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, लुलिया वंतूर, कतरिना कैफ या अभिनेत्रींबरोबर सलमान खानचे नाते मोठ्या चर्चेत होते. ऐश्वर्या राय व सलमान खानच्या नात्याची आजही अनेकदा चर्चा होताना दिसते.

कामाच्या बाबतीत बोलायचे, तर अभिनेता याआधी ‘सिकंदर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील प्रमुख भूमिकेत होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपयश आल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी सलमानच्या या चित्रपटाला प्रतिसाद दिला नाही. आगामी काळात तो अपूर्व लाखिया यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो हा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो. या शोचा चाहतावर्ग मोठा असून, हा कार्यक्रमदेखील प्रेक्षकांना खळखळून हसवतो. आता सलमान खाननंतर द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कोणता कलाकार पाहुणा म्हणून येणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.