सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी निर्मात्यांच्या अपेक्षेप्रमाणे कमाई न करू शकलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या दिवशीच्या मानाने दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने मोठाच गल्ला जमवला.

पहिल्या दिवशी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’सारखी चांगली कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसं काहीही झालं नाही. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतातून फक्त १५ कोटींची कमाई केली. फक्त ‘पठाण’च नाही तर, सलमान खानच्या आधी रिलीज झालेल्या चित्रपटांच्या तुलनेतही ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई कमी होती.

आणखी वाचा : “सलमान, चित्रपट करणंच थांबव आता…”, ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे नेटकरी नाराज; म्हणाले, “या वयात…”

पण काल म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. कालिया चित्रपटाने २५.७५ कोटींचा गल्ला जमवला. ईदच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाला झाला. पहिल्या दिवशीच्या मानाने दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने दहा कोटी अधिक कमावले. तर आता या चित्रपटाचं देशभरातून एकूण कलेक्शन ४१.५६ कोटी झालं आहे.

हेही वाचा : “हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत.साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत.