बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख मिळवलेला अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. ५७व्या वर्षीही अविवाहित असलेल्या सलमानच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. सलमानने नुकतंच मित्राच्या लग्नात हजेरी लावल्यामुळे त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता सलमान खानही निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित होता. यादरम्यानचे सलमान खानचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा>> आईच्या निधनानंतर राखी सावंतने किरण मानेंना केलेला फोन; अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला “ओक्साबोक्शी रडणाऱ्या…”

हेही वाचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”

‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन राहुल कनाल यांच्या लग्नातील सलमान खानचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सलमानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. अनेकांनी सलमानला लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. एकाने कमेंट करत “भाई सगळ्यांच्या लग्नात हजेरी लावतो, पण स्वत: लग्न करत नाही”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “फक्त लोकांच्या लग्नातच जाणार की स्वत: पण लग्न करणार”, अशी कमेंट केली आहे. “सलमान भाई लग्न करा”, असंही एका युजरने म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, शाहरुख खान व्हिडीओ शेअर करत म्हणाला “पठाणच्या घरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सलमान खान ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे. बहुचर्चित शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात त्याने कैमिओ केला आहे. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा टीझरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.