बॉलिवूडचा दबंग, सगळ्यांचा लाडका भाइजान सलमान खानचे आगामी चित्रपट खूप चर्चेत आहेत. कित्येक दिवसांपासून त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. सलमान त्याचे चित्रपट प्रामुख्याने ईदला प्रदर्षित करतो. त्यामुळे २०२२ च्या ईदला ‘टायगर ३’ प्रदर्शित होईल अशी चर्चा होती. मात्र, यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. नुकतीच या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे आता हा चित्रपट ईदला नव्हे तर २०२३ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

यापाठोपाठ आता सलमान खानने घोषणा त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटही पुढच्यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, सलमान खानचे चित्रपट प्रामुख्याने ईदच्या दिवशी प्रदर्शित होताना पाहायला मिळाले आहेत. ‘वॉन्टेड’ नंतर ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘ट्यूबलाइट’ आणि ‘भारत’सह आता ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३ मधील ईदला सिनेमागृहात दर्शकांच्या भेटीला दाखल होणार आहे.

आणखी वाचा : हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ बनला होता ऐश्वर्या रायचा वकील; ‘हा’ चित्रपट आठवतोय का?

फरहाद सामजीद्वारा दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली असून या अ‍ॅक्शन-पॅक चित्रपटात पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत. तसेच, पुढच्या वर्षी दिवाळीत मनीष शर्माद्वारा दिग्दर्शित ‘टायगर 3’सह सलमान खान टायगरच्या रूपात परत येईल. ‘टायगर’ फ्रँचायझीतील पहिले दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले असतानाच, आता ‘टायगर ३’देखील यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट सलमान खान आणि कतरिना कैफच्या जोडीला दर्शकांसमोर पुन्हा आणेल. ‘टायगर 3’ या चित्रपटाचे जगभरात चित्रीकरण झाले असून, निर्माते YRF नी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना अ‍ॅक्शन-पॅक अनुभव देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. सलमान खानचे हे दोन्ही आगामी चित्रपट पुढच्या वर्षी ईद आणि दिवाळीला दर्शकांच्या भेटीला येणार असून, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतील यात काहीच शंका नाही.