बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलेच चर्चेत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचं राहणीमान. त्यांचे कपडे, त्यांचे दागिने, त्यांचे शूज आणि त्यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मध्यंतरी शाहरुख खान ने घातलेल्या निळ्या रंगाच्या घड्याळाची खूप चर्चा होती तर आता त्यापाठोपाठ सलमान खानच्या एका फोटोने चर्चेत आला आहे.

सध्या सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. हा फोटो ‘बिग बॉस १६’मधील स्पर्धक सुंबुल तौकीर खान हिने पोस्ट केला आहे. यात ती आणि सलमान एकत्र दिसत असून सलमानने सुंबुलच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो संबूलने पोस्ट केला असला तरीही यात सलमानने घातलेल्या घड्याळाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनाआधीच सलमान खानच्या ‘टायगर ३’ने कमावले ‘इतके’ कोटी, ‘पठाण’लाही टाकलं मागे

बिग बॉस १६ संपल्यानंतर सुंबुलने सलमान खानबरोबर एक फोटोशूट केलं होतं. याच दरम्यानचा एक फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. यात सलमानने रोलेक्स कंपनीचं घड्याळ घातलं आहे. आता याची किंमत ‘इंडियन वॉच कॉनेसर’ या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार हे घड्याळ रोलेक्स कंपनीच्या YACHT मॉडेलचं आहे. या घड्याळमध्ये १८ कॅरेट सोन्याची केस लावली गेली आहे. या घड्याळाची किंमत तब्बल २८ लाख ९० हजार इतकी आहे. या घड्याळाची बाजारातील किंमत ३५ लाख आहे.

हेही वाचा : स्टॅन नाही तर सलमान खानसाठी प्रियांका चहर चौधरीच ‘बिग बॉस १६’ची विजेती, कारण सांगत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानच्या घड्याळाची किंमत ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. आता सलमानचा हा फोटो खूप व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता सलमान खान त्याच्या चित्रपटा व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.