Deepak Parashar on Sanjay Khan and Zeenat Aman relationship: बॉलीवूड कलाकारांच्या अफेअर, रिलेशनशिपबद्दल अनेकदा बोलले जाते. वर्षानुवर्षे त्यांच्या नात्यांची चर्चा होताना दिसते. अभिनेते दीपक पाराशर यांनी ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री झीनत अमान प्रमुख भूमिकेत होती.

अभिनेत्री झीनत अमान आणि दीपक पाराशर हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. यावर दीपक पाराशर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. तसेच संजय खान व झीनत अमान यांच्या नात्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. याबरोबरच, आजही झीनत अमान यांच्याबद्दल मनात भावना असल्याचे वक्तव्य केले.

दीपक पाराशर यांनी नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते खरंच झीनत अमान यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते का यावर वक्तव्य केले. ज्यावेळी ‘इन्साफ का तराजू’चे शूटिंग सुरू होते, त्यावेळी झीनत अमान व संजय दत्त हे नात्यात होते. अभिनेते म्हणाले, “जेव्हा मी झीनतला भेटलो, त्यावेळी ती तिच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होती. तिची वैयक्तिक कारणे होती, बहुतेक ती आर्थिक बाबींशी संबंधित होती.”

“झीनतला भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्यांच्यात…”

“संजय खान दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात ती तिचे स्वत:चे पैसे गुंतवत होती. पण, ते सर्वकाही त्यांच्या हाताबाहेर जात असल्याचे वाटत होते. याचदरम्यान संजयने झीनतला मुंबईला बोलावले आणि मला तिची मदत करण्यासाठी सांगितले. तिने मला सांगितले की, ती त्याच रात्री परत येईल आणि सकाळी ४ च्या शूटिंगसाठी हजर राहील, पण झीनत सेटवर त्या दिवशी परत आली नाही.”

दीपक पाराशर पुढे म्हणाले, “मी झीनतचा खूप जवळचा मित्र होतो. असा मित्र, जो तिला रडण्यासाठी खांदा देऊ शकतो. पण, आमच्या मैत्रीचा संजय खान यांनी चुकीचा अर्थ घेतला. त्यांचा गैरसमज झाला. त्यांना वाटले की झीनत एकाच वेळी दोघांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर तो प्रसंग घडला. सकाळी ११ च्यादरम्यान झीनतला मुंबईहून फोन आला. झीनतला भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्यांच्यात भांडण झाले असेल. तिला ढकलून देण्यात आले किंवा तिला मारहाण करण्यात आली होती. नेमके काय घडले हे मला काहीच माहीत नाही. तिने चोप्रा साहेबांना फक्त सांगितले की तिला त्रास देण्यात आला आहे आणि ती जखमी झाली आहे. झीनतने असेही सांगितले की संजय खान व त्यांची पत्नीदेखील तिथे होती.”

झीनत अमान म्हणालेल्या…

झीनत अमान यांनी सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत संजय खान यांच्याबरोबर नात्यात असताना सार्वजनिकरित्या झालेल्या छळाबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “मी त्या आठवणी पुसून टाकलेल्या आहेत, कारण मला वाटते की मानवी मन हे करू शकते. जेव्हा काहीतरी अप्रिय असते, तेव्हा मन असे भासवते की असे काहीच घडले नाही आणि तुम्ही स्वतःला वचन देता की ते पुन्हा कधीही होणार नाही.”

या सगळ्यात झीनत अमान यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती. याबद्दल एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्या म्हणालेल्या, “मला दिसण्यात अडचण येत होती. ४० वर्षांनंतर वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीनंतर मला माझी दृष्टी परत मिळाली आहे.”

संजय खान म्हणालेले….

हृषिकेश कननला दिलेल्या मुलाखतीत संजय खान यांना झीनत अमान यांना झालेल्या दुखापतीबद्दल विचारले होते. तसेच, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्याचा का उल्लेख केला नाही, याबद्दलही विचारले होते. यावर ते म्हणालेले, “गोष्टीची एकच बाजू ऐकून घेतली, मला त्याबद्दल काहीही विचारले नाही, हे खूप भीतीदायक आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्याविरुद्ध केलेली योजना होती. तिच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यासाठीसुद्धा मला जबाबदार धरले. तिला दिसत नसेल, तिला डोळा गमवावा लागत असेल तर ते वाईट आहे.”

“जर तुम्ही १९८१ ते १९८४ हा काळ पाहिला तर तिने खूप चित्रपट केले आहेत हे पाहायला मिळते. हा याचा पुरावा आहे की तिचे डोळे चांगले आहेत. नंतरच्या काळात ती थोडीशी डोळे मिचकावू लागली, कारण तिची आई थोडीशी डोळे मिचकावत असे. ही एक वंशपरंपरागत गोष्ट आहे. पण, या सगळ्याचा दोष मला देण्यात आला की मी तिला कानाखाली मारली.”