आजच्याच दिवशी २०१८ साली संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ६ वर्षं पूर्ण झाली असली तरी हा हा चित्रपट लोकांसमोर आणण्यामागचा प्रवास हा किती खडतर होता हे आपल्याला एक प्रेक्षक म्हणून चांगलंच ठाऊक असेल. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाला झालेला विरोध, एकूणच तापलेलं वातावरण, भन्साळी यांना झालेली मारहाण, मुख्य कलाकारांना मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चेत होता.

राजपूत संस्कृतिला धक्का लावायचा प्रयत्न हा चित्रपट करेल असा दावा त्यावेळी बऱ्याच लोकांनी केला होता. नंतर बऱ्याच वादानंतर चित्रपटाचं नावही ‘पद्मावत’ ठेवण्यात आलं अन् प्रचंड अशा बंदोबस्तात हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला अन् या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. चित्रपटाला ज्या गोष्टींमुळे विरोध होत होता त्याउलटच दृश्य चित्रपटात पाहायला मिळालं. या चित्रपटातून राणी पद्मावतीच्या शौर्याची गाथा साऱ्या जनतेसमोर मांडण्यात आली अन् प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’च्या ‘कॉफी हॅम्पर’मध्ये असतात ‘या’ भन्नाट गोष्टी; खुद्द करण जोहरनेच केला खुलासा

या एकूण प्रवासाबद्दल आणि हा चित्रपट सादर करताना आलेल्या अनुभवांची संजय लीला भन्साळी यांनी आठवण काढली आहे. हा अनुभव किती भयावह होता याविषयी बोलताना ते म्हणाले, “हा सगळाच प्रकार फार भयावह होता. मला माझ्या आईची जास्त चिंता होती, पण ती या सगळ्या संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. जर ती नसती तर मी या सगळ्याला कसा सामोरा गेलो असतो कोणास ठाऊक? माझी आई सतत म्हणायची, हे सगळं माझ्या मुलाच्या बाबतीत का घडतंय, तो तर इतके उत्तम चित्रपट बनवतो. माझी आई माझ्यासाठी एक भक्कम आधार होती.”

इतकी संकटं येऊनसुद्धा संजय लीला भन्साळी यांनी हार नाही मानली. ते म्हणाले, “मी शस्त्र टाकायचा विचार कधीच केला नाही, तो विचार माझ्या मनाला कधी स्पर्शूनच गेला नाही. जर तसं झालं असतं तर मी दिग्दर्शक म्हणून तिथेच संपलो असतो. माझ्यावर जेव्हा जेव्हा हल्ला झाला मी त्यातून धडा घेतला अन् माझं दुःख आणि वेदना यांचा वापर मी माझ्या कामासाठी केला. पद्मावत करताना या गोष्टीची मला सर्वात जास्त मदत झाली.”

पुढे भन्साळी म्हणाले, “मी जेव्हा मागे वळून या सगळ्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा मला फक्त चांगल्या आठवणीच दिसतात. रणवीर आणि शाहिद दोघांनी कमालीचं काम केलं. रणवीरची भूमिका ही जास्त वजनदार होती, पण शाहिदनेसुद्धा त्याच्या तोडीस तोड असंच काम केलं आहे. दीपिकाच्या बाबतीत मी काय बोलू, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे यात काहीच वाद नाही पण ती आजवर कधीच कोणत्या चित्रपटात इतकी सुंदर दिसलेली नाही.”