बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच करणचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’चा सीझन ८ पार पडला. वेगवेगळ्या बॉलिवूड कलाकारांनी या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली आणि मनसोक्त गॉसिप करत गप्पा मारल्या. गॉसिपप्रमाणेच करण जोहरचा हा चॅट शो त्याच्या खास ‘कॉफी हॅम्पर’मुळेही चर्चेत असतो.

कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांबरोबर ‘रॅपिड फायर’ राऊंड खेळत करण त्या पाहुण्यांपैकी एकाचं नाव विजेता म्हणून जाहीर करतो अन् त्या व्यक्तिला करण जोहरकडून हे खास ‘कॉफी हॅम्पर’ देण्यात येतं. दिसायला एकदम मोठं असलेल्या या हॅम्परमध्ये सेलिब्रिटीजना नेमक्या कोणत्या भेटवस्तू मिळतात याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. या हॅम्परमध्ये अत्यंत महागड्या आणि ऊंची वस्तु असतात ही गोष्ट याआधीदेखील करण जोहरने स्पष्ट केली होती.

OpenAI CEO praised pune boy Prafulla Dhariwal
OpenAI च्या सीईओने केले, ‘पुण्याच्या’ प्रफुल्ल धारिवालचे कौतुक! म्हणाले, “GPT-4o हे त्याचे कौशल्य…”
india sebi advises regulators to supervise cryptocurrency trading
‘क्रिप्टो’ व्यवहारांवर नियंत्रणासाठी सेबी अनुकूल; रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेला छेद देणारा पवित्रा
BJP Ajay Badgujar Kit Found Gold Biscuit Claims Viral Video
घाटकोपरमध्ये भाजपाच्या ‘या’ नेत्याच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटे? Video मुळे गोंधळ, पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
Crime noida live in relationship
३५ वर्षीय व्यक्तीने केला ५० वर्षीय लिव्ह इन पार्टनरचा खून; इतर पुरुषाशी संबंध असल्याचा होता संशय
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
crime against minor
बलात्कार पीडितेला मदत केली म्हणून हिरो झाला, आता अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत
विराट कोहलीच्या जिव्हारी लागली ‘ती’ विकेट! चाहत्याने प्रश्न विचारतच एका सेकंदात दिली प्रतिक्रिया, पाहा Video
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया ३’मध्ये आलेल्या जोडप्याला ‘झोमॅटो’च्या सीईओने फटकारलं; प्रेक्षकांनी काढली अशनीर ग्रोव्हरची आठवण

आता नुकतंच एका व्हिडीओच्या माध्यमातून करणने प्रथमच या त्याच्या खास ‘कॉफी हॅम्पर’मध्ये नेमकं काय काय असतं याबद्दल खुलासा केला आहे. या हॅम्परमधील सगळ्याच गोष्टींचा उलगडा करणने केला नसला तरी प्रामुख्याने या हॅम्परमध्ये सेलिब्रिटीजना कोणत्या गोष्टी दिल्या जातात ते करणने सांगितलं आहे. करणने या व्हिडीओच्या माध्यमातून ते हॅम्पर उघडून त्यातील काही खास गोष्टी दाखवल्या आहेत.

करणच्या या झकास कॉफी हॅम्परमध्ये मोबाइल फोन्स आणि गो प्रो कॅमेरासारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात. याबरोबरच काही स्कीन केअर आणि ब्युटी प्रॉडक्टही आपल्याला पाहायला मिळतात. ऊंची ब्रॅंडचा चहा, पेय आणि काही महागडी चॉकलेट्सही यामध्ये असतात. याबरोबरच या आठव्या सीझनच्या निमित्ताने करणने या हॅम्परमध्ये एक सुंदरसा हाताने बनवलेला कॉफी मगदेखील सामील केला आहे.

याबरोबरच हॅम्परमधील आणखी काही महागड्या वस्तु करणने या व्हिडीओमध्ये दाखवलेल्या नाहीत. काही गोष्टी या सीक्रेटच ठेवायच्या असतात असं त्याने या व्हिडीओमध्येही सांगितलं आहे.या महागड्या वस्तूंमध्ये आणखी काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि महागडे डिजायनर दागिने यांचाही समावेश असल्याचा अंदाज बऱ्याच लोकांनी लावला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाचा ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझनही चांगलाच गाजला. खासकरून रणवीर सिंह व दीपिका पदूकोणच्या एपिसोडमुळे शोची प्रचंड चर्चा झाली. तसेच सनी देओल, बॉबी देओल, शर्मिला टागोर, सैफ अली खान अशा वेगवेगळ्या जोडयांनी यंदाच्या सीझनमध्ये हजेरी लावून शोची रंगत वाढवली.