सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. कोणी फटाके उडवत, कोणी नातेवाईकांच्या घरी जात, तर कोणी आपल्या घरच्यांबरोबर फराळाचा आनंद घेताना दिसतोय. कलाकारही यात मागे नाहीत. गेल्या दोन दिवसात जवळपास सगळ्या कलाकारांनी ते यंदा दिवाळी कशी साजरी करत आहेत हे दाखवणारा एखादा तरी फोटो पोस्ट केला. पण सगळ्यात लक्ष वेधून घेतलं आहे ते सपना चौधरी हिच्या पोस्टने.

आणखी वाचा : Photos: नयनतारा आणि विग्नेश यांच्या मुलांची पहिली झलक दिवाळीच्या मुहूर्तावर आली समोर, तुम्ही फोटो पाहिलेत का?

सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘ए वतन ए वतन…’ हे गाण वाजत आहे. या व्हिडीओत सपना बर्फाळ भागात पोहोचून भारतीय लष्कराच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसत आहे. यावेळी तिने सैनिकांशी संवाद साधला, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढले. भारतीय लष्करातील सैनिकांनाही सपना चौधरीचं हे सरप्राइज आवडल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर या व्हिडीओत दिसत आहे. त्यांनीही सपना चौधरीचे छान आदरातिथ्य केलं.

हेही वाचा : Video: दीपावलीच्या शुभ दिनी अक्षय कुमार देव भक्तीत तल्लीन; त्याच्या ऑफिसमधील पूजेचा व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “कोणताही दगड नाही, लोखंड किंवा लोहा नाही, सर्वांचे सामाईक रूप भारताचे सैनिक आहे.’ यासोबतच तिने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या कृतीमुळे सर्वजण भारावून गेले असून सध्या सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.