Premium

Video : “छोटा भाई है मेरा”, सारा अली खानचे भावावर आहे जीवापाड प्रेम; दोघांचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

अभिनेत्री सारा अली खानचे भावावरील प्रेम पाहून नेटकरी भारावले

sara ali khan and ibrahim ali khan cute video viral
अभिनेत्री सारा अली खानचे भावावरील प्रेम पाहून नेटकरी भारावले

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला असून, सध्या या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करीत आहेत. आतापर्यंत चित्रपटाने २२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. याचनिमित्ताने सारा अली खानने कुटुंबासह चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला. यावेळी साराची आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘जब वी मेट’ पाहिल्यावर काय होती शाहिद कपूरच्या मुलांची प्रतिक्रिया? अभिनेत्याने सांगितले, “दोघेही उत्सुक होते, पण…”

इन्स्टाग्राम सध्या सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा आपल्या भावाचे पापाराझींपासून रक्षण करताना दिसत आहे. दरम्यान, इब्राहिम अली खान साराबरोबर चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर त्याला मीडियाने घेरले यामुळे इब्राहिम काहीसा गोंधळला त्याचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. पापाराझींच्या गर्दीत इब्राहिम आपली कार शोधत असताना म्हणाला, “माझ्याकडे येऊ नका तुमची हिरोईन तिथे उभी आहे.” एकंदरीत इब्राहिम कॅमेरापासून दूर पळत होता.

हेही वाचा : 72 Hoorain : दहशतवाद, ७२ कुमारिका मुली अन्…; ‘द केरला स्टोरी’ नंतर येणार ‘७२ हूरें’, टीझर प्रदर्शित

सारा अली खानला भावाचा गोंधळ उडाल्याचे कळाल्यावर ती “बाबा, इब्राहिम कुठे आहे? इब्राहिम…” अशा जोर-जोरात हाका मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सारा पापाराझींबरोबर फोटो काढण्यात व्यस्त होती आणि इब्राहिम कार शोधत होता यामुळे दोघे वेगळे झाले होते. इब्राहिम दिसल्यावर, साराने त्याला कारमध्ये बसवल्यानंतर स्वतःच दरवाजा बंद केला आणि म्हणाली, “छोटा भाई है मेरा”

भावा-बहिणीचे नाते पाहून नेटकऱ्यांनी दोघांचेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे युजर्सनी “सारा अली खान अगदी तिच्या आईप्रमाणे आपल्या भावाची सतत काळजी घेताना दिसते” अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर केल्या आहेत. साराप्रमाणे इब्राहिम अली खानसुद्दा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 12:08 IST
Next Story
“फक्त दोन चमचे आणि एक ताट…” लग्नानंतर मीरा घरी आल्यावर अशी होती शाहिद कपूरच्या घराची अवस्था