scorecardresearch

सचिन तेंडुलकरची लेक सारा करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट? फोटो व्हायरल

सारा तेंडुलकर सध्या शिक्षणासाठी लंडनमध्ये राहत आहे.

सचिन तेंडुलकरची लेक सारा करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट? फोटो व्हायरल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सारा लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते अनेकदा प्रतिक्रिया देतात. पण सध्या तिचे व्हायरल होणारे फोटो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे.

सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये राहत आहे. लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे. शिक्षण करता करताच ती मॉडेलिंग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावताना दिसतेय. याआधी साराने काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी फोटोशूटही केलं होतं. दरम्यान काही महिन्यांपूर्वी साराचे नाव भारतीय क्रिकेट संघातील शुभमन गिलसोबत जोडलं गेलं होतं. शुभम आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता वेगळेच फोटो समोर आले आहेत.

आणखी वाचा : अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी कियारा जाहीर करणार तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख

आता शुभमन सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करत असल्याचं बोललं आहे. तर सारा तेंडुलकरचे एका पार्टीदरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तिचं नाव जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडशी जोडलं जात आहे. सारा तेंडुलकरचे व्हायरल होत असलेले पार्टीतील फोटो पाहून त्या फोटोंमध्ये साराबरोबर दिसणारा तो मिस्ट्री बॉय कोण आहे अशी चर्चा रंगली होती. पण हा मिस्ट्री बॉय म्हणजे ओरहान अवत्रमणी आहे. त्याला सगळे ओरी म्हणतात.

हेही वाचा : ओरहान अवत्रमणीशी असलेल्या अफेअरच्या चर्चांवर अखेर जान्हवी कपूरने सोडले मौन; म्हणाली, “आम्ही दोघं…”

ओरहानची बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी चांगली ओळख आहे. यापूर्वी त्याचे अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, जान्हवी कपूर यांच्यासोबत पार्टी करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. ओरहान आणि जान्हवी कपूर काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता त्याला साराबरोबर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे फोटो पाहून आता ती दोघं एकमेकांना डेट करतायत की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 09:47 IST

संबंधित बातम्या