बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च २०२३ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतिश यांच्या निधनानंतर कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला. शिवाय त्यांचं संपूर्ण कुटुंबही कोलमडून गेलं. त्यांच्यामागे पत्नी शशी कौशिक व मुलगी वंशिका असा परिवार आहे. सतिश यांची मुलगी वंशिका ११ वर्षांची आहे. आता तिने शेअर केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

१३ एप्रिलला सतिश यांचा ६७वा वाढदिवस होता. यावेळी अनुपम खेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान अनुपम यांनी सतिश यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वंशिकानेही वडिलांसाठी भावनिक पत्र लिहिलं होतं. या कार्यक्रमानिमित्त तिने हे पत्र सगळ्यांसमोर वाचून दाखवलं.

आणखी वाचा – Video : फेसाळलेला समुद्र, हातात हात अन्…; प्रभाकर मोरे पत्नीसह समुद्रकिनारी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मोरेंची शालू”

अनुपम सतिश यांच्या कुटुंबियांच्या खूप जवळ आहेत. वंशिकाचंही अनुपम यांच्याबरोबर खास नातं आहे. आता तिने अनुपम यांच्याबरोबर पहिला रिल व्हिडीओ शेअर केला. हा रिल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. वंशिकाने हा व्हिडीओ शेअर करताना सतिश कौशिक अनुपम यांच्यापेक्षा उत्तम डान्सर होते असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “वडिलांचे पैसे उडवतो आणि…” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला, “माझ्या तोंडावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ

वंशिका म्हणाली, “अनुपम काकांबरोबर माझा सगळ्यात पहिला रिल व्हिडीओ. त्यांना अजून थोडा सराव करण्याची गरज आहे. अनुपम काकांपेक्षा माझे वडिलच उत्तम डान्सर होते. पण प्रयत्न केल्याबद्दल अनुपम काका खूप धन्यवाद. लव्ह यू”. वंशिकाच्या या व्हि़ीओचं नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.