बॉलीवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शुरा खान यांनी ५ ऑक्टोबर रोजी त्यांची पहिली मुलगी सिपारा हिचं स्वागत केले. अरबाज व शुराची लेक दोन आठवड्यांची झाली आहे. आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी अरबाजचं सिपाराच्या जन्माबद्दल अभिनंदन केलं. तसेच तो मुलीचा बाबा झाल्याने त्याला एक क्युट इशारा दिला.

शबाना आझमींनी शनिवारी इन्स्टाग्रामवर अरबाजबरोबरचा एक फोटो शेअर केला. फोटोत अरबाज केक कापताना दिसतोय. तर जावेद अख्तर आणि इतर टाळ्या वाजवताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना शबाना यांनी दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे. “सिपाराच्या जन्माबद्दल अभिनंदन अरबाज खान. Warning: ती तुला स्वत:च्या इशाऱ्यावर नाचवेल. हा मुलींचा जन्मसिद्ध हक्क आहे,” असं शबाना आझमींनी लिहिलं.

अरबाज खानने शबाना आझमींच्या या पोस्टवर कमेंट केली. “मला तिच्या इशाऱ्यावर नाचायला आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद,” असं अरबाज खान म्हणाला.

पाहा पोस्ट

अरबाज आणि शूरा यांनी मुंबईतील त्याची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी एका खासगी समारंभात २४ डिसेंबर २०२३ रोजी निकाह केला. या लग्नाला दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. या वर्षी जूनमध्ये शूरा गर्भवती असल्याची बातमी आली. अरबाज खान ५८ व्या वर्षी ५ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा बाबा झाला.

अरबाज खानला अभिनेत्री मलायका अरोरापासून २२ वर्षांचा मुलगा अरहान खान आहे. आता तो चिमुकल्या लेकीचा बाबा झाला आहे. शुरा व अरबाज यांनी इन्स्टाग्रामवर एक क्युट पोस्ट करून लेकीचं नाव सिपारा ठेवल्याची गुड न्यूज दिली.