बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा ट्रोलही करण्यात आले होते. एक काळ असा होता जेव्हा अनुराग कश्यप नेहमीच सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडायचे. या ट्वीटमुळे त्यांच्या मुलीला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. याच गोष्टीवरुन शाहरुख खानचा अनुराग कश्यप यांना ओरडा खावा लागला होता. अनुराग कश्यप यांनी खुद्द याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- आलिया भट्टने सोनम कपूरच्या लेकासाठी पाठवली खास भेट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

अनुराग कश्यपने स्वत: अनेकदा या गोष्टीबद्दल खुलासा केला आहे की त्यांच्या ट्वीट्स आणि राजकीय विचारांमुळे त्यांची मुलगी आलियालाही बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. या धमक्यांचा त्यांच्या मुलीवर खूप वाईट परिणाम झाला आणि तिला पॅनीक अटॅक येऊ लागले. अनुरागने अलीकडेच ‘अनफिल्टर्ड विथ समधीश’ कार्यक्रमात यावर भाष्य केले आहे.

हेही वाचा- परिणीतीने घेतला दिल्लीतील स्ट्रीट फूडचा आस्वाद; बरोबर असणाऱ्या व्यक्तीला पाहून चाहते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखने अनेकदा अनुरागला अशा प्रकारचे ट्वीट न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर नाराज होऊन शाहरुखने त्याला ट्वीटरवरच येऊ नकोस असे सांगितले होते. शाहरुख खान महाविद्यालयात अनुराग कश्यपचा सिनिअर आहे. अनुराग कश्यप त्याला खूप मानतो. एवढंच नाही तर शाहरुखचा फोन आल्यावर तो उठून उभा राहत असल्याचेही त्याने सांगितले.