बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या यशानंतर चाहते शाहरुखच्या डंकी चित्रपटाची वाट बघत आहे. तर दुसरीकडे शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानही ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. दरम्यान शाहरुख आणि सुहाना खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- पाच अभिनेत्यांनी नाकारली भूमिका, पण ‘या’ चित्रपटाने पटकावलेले चार राष्ट्रीय पुरस्कार, अवघ्या १६ कोटींचे बजेट अन् कमावलेले ५२ कोटी

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख त्याची लाडकी लेक सुहानाबरोबर स्क्रिन शेअऱ करणार आहे. लवकरच या दोघांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अद्याप या चित्रपटाची घोषणा करण्यात आली नसली तरी जानेवारीमध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या जवान आणि पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. येत्या २२ डिसेंबरला त्याचा डंकी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर तापसी पन्नू, विक्की कौशल यांची प्रमुख भूमिका आहे. शाहरुखच्या अगोदरच्या चित्रपटांची कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- “दोन व्यक्तींमधील नातं…” सारा अली खानच्या ब्रेकअपबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्तिक आर्यन झाला नाराज; म्हणाला ” स्वत:चा मान…”

सुहानाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तिचा ‘द आर्चीज’ चित्रपट ७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केलं आहे. होत आहे. या चित्रपटात सुहानाबरोबर बोनी कपूर यांची छोटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नातू अगस्त्य नंदा मिहिर आहुजा, आदिती सहगल, युवराज मेंडा आणि वेदांग रैना यांची प्रमुख भूमिका आहे.