‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ अशा लागोपाठ तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या आधारे २०२३ हे वर्ष शाहरुख खानने गाजवलं. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यांत तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं होतं. त्याच्या तिन्ही चित्रपटांनी गेल्यावर्षी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यामुळे सध्या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये शाहरुख खानचं वर्चस्व पाहायला मिळत आहेत.

शाहरुख खानने बहुमानाचा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्राप्त केल्यानंतर आता ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. पुरस्कार जिंकल्यावर शाहरुखने त्याच्या कुटुंबीयांना रंगमंचावरून एक खास मेसेज दिला आहे. सध्या किंग खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींची कलाविश्वात एन्ट्री, आई अन् मुली एकाच मालिकेत झळकणार, जाणून घ्या…

पुरस्कार जिंकल्यावर भर कार्यक्रमात शाहरुख खानने त्याच्या कुटुंबीयांना खास मेसेज दिला आहे. “हा पुरस्कार मी माझा मुलगा आर्यन, सुहाना, अबराम आणि पत्नी गौरीला डेडिकेट करतो आहे. तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की, जब तक तुम्हारा बाप जिंदा है तब तक एंटरटेनमेंट जिंदा हैं.” असा मेसेज अभिनेत्याने त्याच्या कुटुंबीयांना दिला आहे.

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे पोहोचला गोव्यात! आमिर खानच्या ‘दिल चाहता है’मधील ‘तो’ सीन केला रिक्रिएट

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan Source (@aryankhansource)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून त्याचे चाहते यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. याशिवाय अभिनेत्याच्या कामाविषयी सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘पठाण २’चं शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय सुहानाच्या चित्रपटात किंग खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.