बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केला आहे. ‘पठाण’चे चित्रपटगृहातील शो हाऊसफूल होत आहेत. आत्तापर्यंत ‘पठाण’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५७ कोटींची विक्रमी कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७० कोटींची गल्ला जमवत अवघ्या दोन दिवसांत पठाणने १२७.५० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी ‘पठाण’च्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर चौथ्या दिवशी पठाणने ५५ कोटींचा गल्ला जमावला. पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा बोलबाला पाहायला मिळाला.

हेही वाचा>>“त्याच्या धर्मामुळे…”, ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानचा फोटो शेअर करत हेमांगी कवीची पोस्ट

वीकेएण्डलाही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चीच जादू पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी पठाणच्या हिंदी व्हर्जनने ६०-६२ कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर रविवारी पठाणने नेट ७० कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अवघ्या पाचच दिवसांत पठाणने २८० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. सोमवारी ‘पठाण’ चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा>> रितेश देशमुखच्या चित्रपटातील गाण्यावर मुलीने बनवलेला व्हिडीओ संजय राऊतांनी केला शेअर, म्हणाले “वेड…”

हेही वाचा>> ३५व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं १०वं लग्न, फोटो शेअर करत म्हणाली “जेव्हा तुम्ही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या ‘पठाण’ची जादू जगभरात पाहायला मिळत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात ‘पठाण’चा डंका पाहायला मिळत आहे. ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे.