आज सिनेइंडस्ट्रीत आणि देशभरात फक्त ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता चित्रपटाचे शोदेखील वाढवण्यात आले आहे. चित्रपटाला मध्य प्रदेशमध्ये विरोधही झाला, पण विरोधाला न जुमानता प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.

२४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला इंदूरमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. काही गटांच्या विरोधानंतर त्याचे शो नियोजित प्रमाणे सुरू झाले नाहीत. त्यानंतर प्रेक्षकांना वाट पाहावी लागली. पण, विरोध करणाऱ्यांच्या समस्येचं चर्चेतून समाधान झालं आणि चित्रपटाचे शो पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले.

‘पठाण’ने रचला इतिहास! चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; देशभरात ‘इतके’ शो वाढवले

‘पठाण’ आज जगभरात प्रदर्शित झाला, पण मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये काही गटांच्या विरोधानंतर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले होते. पण, हे प्रकरण लवकर मिटवण्यात यश आलं असून दुपारनंतर त्याचे शो सुरू झाले. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक अक्षरशः मोठ्या संख्येने रांगा लावत आहेत.

‘पठाण’ ठरला बॉक्स ऑफिसचा बादशाह; तज्ञांच्या मते पहिल्या दिवशीच करणार ‘एवढी’ कमाई

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडेल, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.