विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताने दिलेलं २४१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून ४३ षटकारात पूर्ण केलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना झाला. हा सामना बघण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते. भारताच्या पराभवानंतर चाहते आणि सेलिब्रिटीही निराश झाले आहेत. पण ते भारतीय संघाच्या खेळाडूंचे चांगल्या खेळीबद्दद कौतुक करत आहेत.

अंतिम सामना पाहण्यासाठी किंग खान शाहरुखदेखील उपस्थित होता. भारताचा पराभव झाल्यानंतर त्याने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत आपल्याला भारतीय संघाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. शाहरुखने लिहिलं, “भारतीय संघाने ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने आज ते घडलं….परंतु क्रिकेटमधील आमच्या लिगसीचा आम्हाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे आभार…तुम्ही पूर्ण भारताला खूप आनंद दिला. तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आदर आहे.”

“बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

अभिनेत्री काजोलनेही टीम इंडियाच्या पराभवानंतर पोस्ट केली आहे. “हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है! टीम इंडिया तुम्ही खूप चांगले खेळलात. आणखी एक वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा,” असं तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kajol post for team india
भारतीय संघाच्या पराभवानंतर काजोलची पोस्ट

दरम्यान, या स्पर्धेतील सर्व १० सामने जिंकून भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने अभ्यासपूर्ण व संयमी खेळी करत भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय खेळाडू भावुक झाले, तर चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. पण पूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या चांगल्या खेळीबद्दल ते कौतुक करत आहेत.