बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात मैत्रीच खास नात आहे. चाहत्यांनाही त्यांच्यातील हे गोडीगुलाबीचं नात बघायला आवडतं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटातील दोघांचे सीन चाहत्यांसाठी पर्वणीच होती. मात्र सध्या शाहरुख आणि सलमानचा एक जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका पुरस्कार सोहळ्यातला आहे. या व्हिडिओत शाहरुख सलमानला आपला पुसस्कार देताना दिसत आहे.

हेही वाचा- अ‍ॅपलचे सीईओ अंबानी कुटुंबाला दर महिन्याला देणार इतकं भाडं; रक्कम ऐकून बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका अवॉर्ड नाईटमध्ये शाहरुख खान सलमान खानची चेष्टा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान स्वत:ला मिळालेल्या पुरस्कारासाठी धन्यवाद भाषण देण्यासाठी सलमान खानला स्टेजवर बोलवताना दिसत आहे.
एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात, जेव्हा शाहरुखने सलमानला स्टेजवर बोलावले कारण त्याला विश्वास होता की शाहरुख सर्व पुरस्कार घेईल.

शाहरुख म्हणाला. “मला स्टेजवर एका सज्जन व्यक्तीला आमंत्रित करायचे आहे जो माझ्यावतीने सर्वांचे आभार मानणार आहे. कारण त्यांना असे वाटते की सर्व पुरस्कार मला मिळतात त्यांना मिळत नाहीत. पुरस्कार सोहळ्यादरम्यान शाहरुख खानची एका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, हा पुरस्कार शाहरुखने सलमान खानला दिला. शाहरुखच्या या वर्तनानंतर सलमान भावूक झाला आणि स्टेजवरच रडायला लागला.

हेही वाचा- ‘आदिपुरुष’साठी कलाकारांनी घेतलं कोट्यवधीच मानधन; प्रभास ठरला चित्रपटातील सगळ्यात महागडा अभिनेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ नंतर लवकरच सलमान आणि शाहरुख ‘टायगर वर्सेज पठाण’ या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार या चित्रपटात शाहरुख आणि सलमान आमने सामने येणार आहेत. या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून यासाठी जबरदस्त पैसा खर्च केला जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे.