बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणाऱ्या शाहरुखने ‘पठाण’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी #AskSRK ट्विटर सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधला.

शाहरुख खानच्या या ट्विटर सेशनमध्ये एका नेटकऱ्याने त्याचा स्त्री वेशातील फोटो शेअर केला होता. ‘मादक स्त्री’ असं म्हणत नेटकऱ्याने शाहरुखला ट्रोल केलं होतं. या नेटकऱ्याला शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. “अरे, नाही नाही…हा मी आहे. स्त्री वेश करुन मी महिलेचा लूक केला होता. मला माहीत आहे, मी सगळ्या लूकमध्ये छान दिसतो. पण तुला चांगल्या लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. तुझी दिशाभूल केल्याबद्दल क्षमस्व”, असं उत्तर शाहरुखने नेटकऱ्याला दिलं आहे.

हेही वाचा>> “घर घेऊन देण्याचं वचन दिलेलं”, नोरा फतेहीच्या आरोपांवर सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा, म्हणाला “तिने माझ्याकडून…”

हेही वाचा>> ‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, दिशा वकानी व ‘बाघा’चा फोटो व्हायरल

शाहरुख खानने नेटकऱ्याला दिलेल्या या रिप्लायने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शाहरुख अधूनमधून #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच दीपिका पदुकोणचं ‘बेशरम रंग’ गाण्याबाबत वक्तव्य, म्हणाली…

दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. परंतु, त्याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही. शाहरुखच्या या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगद्वारे २४ कोटींची कमाई केली आहे.