शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. चाहत्यामध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कमाईत पहिल्याच दिवशी हा चित्रपट ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडले अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान जवान चित्रपटला यश मिळावं याकरता शाहरुख कोणतीही कसर सोडत नाहीये.

हेही वाचा- चित्रपटप्रेमी व शाहरुखच्या चाहत्यांखातर ‘जवान’चा पहिला शो ‘इतके’ वाजता; बॉक्स ऑफिसवर फक्त किंग खानचा बोलबाला

प्रमोशनबरोबरच शाहरुख देवाचा धावाही करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख जम्मूमधये माँ वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेला होता. आता तो आंध्र प्रदेशातील तिरुपतीच्या दर्शनला पोहोचला आहे. त्याने श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी त्याच्याबरोबर त्याची मुलगी सुहाना आणि अभिनेत्री नयनताराही होती.

शाहरुख खानचा बालाजी मंदिरातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दर्शन घेतल्यानंतर चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. शाहरुख खानच्या लूकबद्दल बोलायचे तर त्याने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. सुहाना खान आणि नयनताराही पांढऱ्या सूटमध्ये दिसल्या. व्हिडिओमध्ये तिघेही दर्शन घेताना दिसत आहे.

हेही वाचा- शाहरुखचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट बघू शकता केवळ ६० रुपयांत; कुठे, कसा? घ्या जाणून

जवानचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान जम्मू-काश्मीरमध्ये माँ वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेला होता. शाहरुख खानचा तो व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कोणी ओळखू नये म्हणून त्यावेळे त्याने तोंड झाकले होते. शाहरुखने डेनिम आणि टी-शर्टसोबत हुडी घातली होती. त्याने आपले डोके हुडीने झाकले होते आणि मास्क देखील घातला होता.

हेही वाचा- “मला राष्ट्रीय पुरस्कार…” शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा चर्चेत; सैफ अली खानशी केली तुलना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवानाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानबरोबर या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रियामणी दिसणार आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एटली कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.