Shah Rukh Khan’s Wife Gauri Khan : लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान एक उद्योजिका आहे. ती अनेकदा तिच्या ‘तोरी’ या हॉटेलमुळे चर्चेत असते. त्यासह ती इंटिरियर डिझायनरही आहे. तिची गौरी खान डिझायन या नावाची कंपनीही आहे. परंतु, गौरी खान इंटिरियर डिझायनिंगचे किती पैसे घेते माहितीये का?
गौरी खानने २०१३ साली पहिल्यांदा मुंबईत या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आता दिल्लीतही तिच्या कंपनीच्या ब्रँचेस आहेत. गौरी खानने कधी तिच्या या इंटिरियर डिझायनिंगच्या फीबद्दल काही सांगितलं नाही, परंतु, ‘इंटिरियर ए टू झेड’च्या अहवालानुसार गौरी खान साध्या सल्ल्यासाठी ६ लाख एवढे पैसे घेते. घरगुती इंटिरियर डिझायनिंगची फी प्रोजेक्टनुसार ३० लाख रुपये ते ५ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.
एका लक्झरी व्हिला प्रोजेक्टसाठी ती ३ कोटी ते १० कोटींपर्यंत किंवा त्याहून अधिक फी घेत असावी अशी शक्यता वर्तवली आहे. व्यावसायिक प्रोजेक्टसाठी ५० लाख ते २० कोटी इतकी फी घेते. गौरी खानच्या स्टोरमध्ये ऑर्डर देऊन खास फर्निचरही बनवले जातात. प्रत्येक प्रॉजेक्टची फी वेगळी असून ती त्यानुसार ठरवली जाते.
‘न्यूज १८’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या इंटिरियर डिझायनिंग या क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितलेलं. ती म्हणालेली, “गौरी खान डिझायन २०१३ साली सुरू केलेलं. मी छंद म्हणून याची सुरुवात केलेली, परंतु नंतर त्याचं व्यवसायात रुपांतर झालं. मी काम करता करता याबद्दल शिकले आहे.”
गौरी खान आज नामांकित इंटिरियर डिझायनरपैकी एक मानली जाते. सध्या ती शाहरुख खान व तिच्या मन्नत या आलिशान बंगल्याच्या रिनोवेशनच्या कामात व्यग्र असून येत्या वर्षात मन्नतचं काम पूर्ण होईल, असं तिने या मुलाखतीत सांगितलेलं.
दरम्यान, गौरी खान या व्यतिरिक्त अनेकदा तिच्या ‘तोरी’ या हॉटेलमुळे चर्चेत असते. तिच्या या हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी जात असतात. ती व त्यांचं खान कुटुंबही तिथे वाढदिवस किंवा कुठल्याही सेलिब्रेशनसाठी जात असतात.