५० दिवस पूर्ण करून ८०० स्क्रीन्सवर झळकणारा ‘पठाण’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवरची गणितंच बदलून टाकली. रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत शाहरुखच्या ‘पठाण’ने एक वेगळाच इतिहास रचला. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला तरी याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं.

एका जबरदस्त अॅक्शन चित्रपटात काम करायची शाहरुखची इच्छा आज इतक्या वर्षांनी पूर्ण झाली, पण तुम्हाला माहितीये का की एका मोठ्या क्रांतिकारकाची भूमिका शाहरुख करणार होता, पण काही करणास्तव शाहरुख तो चित्रपट करू शकला नाही. क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची भूमिका शाहरुख करणार होता, पण या कारणामुळे तो भूमिका करू शकला नाही.

आणखी वाचा : सुकेश-जॅकलिनची प्रेम कहाणी येणार रुपेरी पडद्यावर; तिहार तुरुंगाच्या जेलरची ‘या’ दिग्दर्शकाने घेतली भेट

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘रंग दे बसंती’मध्ये प्रथम ‘डिजे आणि चंद्रशेखर आझाद’ या दोन्ही भूमिकांसाठी शाहरुख खानची निवड केली होती. जेव्हा राकेश मेहरा यांनी शाहरुखकडे या चित्रपटासाठी विचारणा केली तेव्हा वेळेच्या अभावी शाहरुखने या भूमिकेसाठी नकार दिला. यानंतर राकेश मेहरा यांनी ही भूमिका आमिर खानला देऊ केली आणि ही भूमिका अजरामर झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिरचा अभिनय आणि एकूणच चित्रपटाची कथा प्रेक्षकांना जबरदस्त आवडली आणि त्यांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून धरला. शाहरुखला मात्र या अजरामर भूमिकेला मुकावं लागलं. ‘रंग दे बसंती’ हा सुपरहीट चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ‘पठाण’च्या घवघवीत यशानंतर आता शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटासाठी लोक उत्सुक आहेत.