बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने नुकतचं चित्रपटसृष्टीत ३१ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘दिवाना’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने या ३१ वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले. बॉलीवूडमधील आपल्या अभिनय कारकिर्दीला ३१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा- “तिचा मृतदेह मी…”; राजपाल यादवने सांगितली पहिल्या पत्नीच्या निधनाची भयानक आठवण, म्हणाला…

शाहरुखची एक महिला चाहती जुळ्या मुलांची आई होणार आहे. ही महिला आपल्या मुलांचे नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार असल्याचेही ट्विट केले आहे. तीने ट्वीट करत लिहिले “सर, मी जुळ्या मुलांची आई होणार आहे.. माझे अभिनंदन करा, मी त्यांची नावे ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार आहे.चाहतीच्या या ट्वीटवर शाहरुखने तिचे अभिनंदन केले आहे. पण मुलांची नावे बदलण्याचा सल्ला त्याने चाहतीला दिला आहे. शाहरुखने चाहतीच्या ट्वीटला उत्तर देत लिहिलं आहे. “अभिनंदन, पण कृपया त्यांना आणखी चांगली नावं द्या!!”

हेही वाचा- कार्तिक आर्यनचा इकोनॉमी क्लासमधून विमान प्रवास; अभिनेत्याला बघून प्रवासी झाले चकित

“शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाचे प्रदर्शन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती देखील दिसणार आहे.