शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. नुकतंच या चित्रपटातील शाहरुखचे पहिले रोमँटिक गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- “वयाच्या ४७ व्या वर्षीही…” आई-वडिलांना सोडून वेगळं न राहण्याबद्दल अभिषेक बच्चनचं मोठं वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार साऊथचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एटली कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘जवान’ चित्रपट शाहरुखच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. याबरोबरच ‘जवान’ हा शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट असल्याचा दावाही केला जात आहे. एका मीडिया संस्थेच्या रिपोर्टनुसार, जवानच बजेट ३०० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.