Pathaan box office collection day 11 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आजवर जगभरात या चित्रपटाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

भारतातसुद्धा जबरदस्त कमाई करत हा चित्रपट रोज वेगवेगळे रेकॉर्ड तोडत एक वेगळा इतिहासा रचत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार या शनिवारी चित्रपटाने २२ ते २४ कोटीची कमाई केली आहे. हे आकडे बघता ‘पठाण’ची भारतातील कमाई ३९८ कोटीच्या घरात गेली आहे आणि लवकरच ४०० कोटी पार करत शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा चित्रपट ठरेल. “अबकी बार ४०० पार” असं म्हणणाऱ्या चाहत्यांच्या मनातील इच्छा शाहरुख खान पूर्ण करेल अशी खात्री आहे.

आणखी वाचा : “शाहरुख खान हा भारताचा टॉम क्रूझ…” अमेरिकी पत्रकाराच्या वक्तव्यावर किंग खानचे चाहते नाराज

‘पठाण’ने आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटालासुद्धा मागे टाकलं आहे. दंगलचा ३८७ कोटी कमाईचा रेकॉर्ड मोडत शाहरुख खानचा हा चित्रपट लवकरच ४०० कोटी क्लबमध्ये प्रवेश मिळवणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुतेक सगळेच रेकॉर्ड मोडणारा ‘पठाण’ आता ‘केजीएफ २’ आणि ‘बाहुबली’चे रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज आहे. कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीमने या चित्रपटाचं प्रमोशन केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या जबरदस्त कमाईनंतर यातील कलाकार आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एकत्रित येऊन मीडियाशी संवाद साधला. सर्व स्तरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कलाकार मंडळी, समीक्षक सगळ्यांनीच चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नुकतंच मीडियाशी संवाद साधताना ‘पठाण’चं यश हे संपूर्ण भारताचं यश आहे असं वक्तव्य देत शाहरुख खानने करोडो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.