अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता. त्याचा चाहतावर्ग संपूर्ण जगभर पसरला आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. अशातच शाहरुख खानने नवीन गाडी घेतल्याचं समोर आलं आहे.

शाहरुख खानला गाड्यांचं खूप वेड आहे. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक आलिशान कार आहेत. आता या त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका कोट्यवधींच्या गाडीचा समावेश झाला आहे. या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

View this post on Instagram

A post shared by Automobili Ardent India (@automobiliardent)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यग्र आहे. अशातच एका यूट्यूबरने एक व्हिडीओ पोस्ट करत शाहरुख खानच्या या नव्या कोऱ्या गाडीची झलक दाखवली. शाहरुख खानने रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही खरेदी केली आहे. ही गाडी त्याने ‘पठाण’च्या यशानंतर खरेदी केली असंही बोललं जात आहे. या आलिशान कारची किंमत ८ कोटींहून अधिक आहे. या कारची ऑन रोड किंमत ९ कोटींवर जाते. कस्टमायझेशन केले तर या कारची किंमत १० कोटींवर जाते. शाहरुखने यातील पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे.

हेही वाचा : “‘पठाण’चा उत्तरार्ध निराशाजनक,” चाहत्याच्या थेट प्रतिक्रियेवर शाहरुख खानचं चोख उत्तर, म्हणाला, “कोणताही चित्रपट…”

आता त्याच्या या गाडीचे अनेक फोटो मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तर यावर प्रतिक्रिया देत शाहरुखचे चाहते त्याने नवीन गाडी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आहेत.