Pathaan Trailer On Burj Khalifa : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षीत ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित झाला. एकीकडे चाहते या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे. वेगवेगळ्या स्तरातून ‘पठाण’ला बॉयकॉट करायची मागणी होताना दिसत आहे. चित्रपटातील गाणी आणि त्यातील अश्लीलता यामुळे ‘पठाण’ चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

शाहरुख मात्र त्याच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतंच शाहरुखने ‘इंटरनॅशनल लीग टी २०’साठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली आणि ‘पठाण’चं जोरदार प्रमोशन केलं. या सोहळ्यात शाहरुखने पठाणमधील डायलॉगसुद्धा म्हणून दाखवले. शाहरुख सध्या दुबईत आहे आणि तिथे त्याची लोकप्रियता प्रचंड आहे तर यश राज फिल्म्सनी एक वेगळा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : LGBTQ समुदायाची बाजू मांडत उर्फी जावेदने केली सद्गुरुंवर टीका; म्हणाली “तुमचा मेंदू…”

१४ जानेवारी म्हणजे आजच शाहरुखच्या या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दिसणार आहे. बुर्ज खलिफावर या ट्रेलरचं स्क्रीनिंग होणार आहे. यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामुळे शाहरुखचे चाहते चांगलेच उत्सुक दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातील गाणं आणि ट्रेलरवरुन प्रचंड चर्चा सुरू आहे. काही लोकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला आहे तर काही लोकांनी यावर सडकून टीका केली आहे. शाहरुखचा हा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर नेमकी काय जादू करतो ते आपल्याला २५ जानेवारीलाच पाहायला मिळेल.