शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई करणारा चित्रपट आता बांगलादेशमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीज होऊन जवळपास चार महिन्यांनी बांगलादेशच्या थिएटर्समध्ये पठाण दाखवला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणारा ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट असेल.

१९७१ मध्ये बांगलादेशची स्थापना झाली. तेव्हापासून एकही हिंदी चित्रपट तेथे प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे, जो पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये प्रदर्शित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे बांगलादेशमध्येही या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळत आहे. तब्बल ४८ चित्रपटगृहात २०० स्क्रीन्सवर ‘पठाण’ बांग्लादेशमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

आणखी वाचा : जेव्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहरुख खानला फटकारलेलं; किंग खानने सांगितलेली आठवण

मीडिया रीपोर्ट आणि वितरकांच्या माहितीनुसार पहिल्या दोन दिवसाची तिकीटे विकली गेली असून हा चित्रपट हाऊसफुल्ल ठरला आहे. येणाऱ्या काही दिवसांत ‘पठाण’ बांगलादेशच्या बॉक्स ऑफिसवरही आणखी धुमाकूळ घालेल यात कसलीच शंका नाही. शिवाय ‘पठाण’च्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येदेखील चांगलीच वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.