What Shammi Kapoor said on Deepika Padukone and Ranbir Kapoor Marraige: बॉलीवूड कलाकारांचे चित्रपट जितके गाजतात, लोकप्रिय ठरतात. तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा होताना दिसते. अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपबाबतदेखील बोलले जाते.
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे नाते टिकू शकले नाही. मात्र, आजही त्यांच्या नात्याची चर्चा होताना दिसते. त्यामध्ये अमिताभ बच्चन व रेखा, सलमान खान व ऐश्वर्या राय, तसेच रणबीर कपूर व दीपिका पादुकोण अशा अनेक कलाकारांची नावे घेतली जातात.
दीपिका पादुकोण व रणबीर कपूर हे एकेकाळी सर्वांत चर्चेत असणारे जोडपे होते. मात्र, कालातरांने त्यांचे ब्रेकअप झाले. सध्या दोघांचीही लग्ने झाली असून, ते आपापल्या आयुष्यात आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
शम्मी कपूर काय म्हणाले होते?
२०१० साली रणबीरचे आजोबा शम्मी कपूर यांनी ‘झूम’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी दीपिका व रणबीरचे लग्न व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. शम्मी कपूर म्हणाले होते, “जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी दीपिकाला रणबीरबरोबर लग्न करण्यासाठी विचारणार आहे. त्यांची जोडी सुंदर आहे. तो उंच आहे आणि तीहीउंच आहे. तो छान दिसतो, ती सुंदर दिसते. त्यांची जोडी छान आहे. आमच्या वेळी अशा मुली नसायच्या. जर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर त्यामध्ये काहीच समस्या नाही. त्यांच्यासाठी ते उत्तम असेल, तर त्यांनी एकत्र आलं पाहिजे.”
एकदा शम्मी कपूर यांनी दीपिकाला त्यांच्या घरी कॉफीसाठी बोलावले होते. ती आठवण सांगत शम्मी कपूर म्हणाले होते, “आम्ही आमच्या घरात छान वेळ घालवला. माझी पत्नी, माझ्या नातीदेखील तिथेच होत्या. मला वाटले की, दीपिकाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ती उत्तम काम करीत आहे.”
दरम्यान, रणबीर कपूर व दीपिका पादुकोण हे बचना ये हसीनो या चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रेमात पडले. त्यांच्या नात्याची मोठी चर्चादेखील झाली. मात्र, त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. दीपिका पादुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंहबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना दुआ ही मुलगी आहे. तर, रणवीर कपूरने २०२२ मध्ये आलिया भट्टबरोबर लग्नगाठ बांधली. आलिया व रणबीरला राहा ही मुलगी आहे.