अभिनेता शरद केळकर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘हर हर महादेव’मुळे त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. त्याचा हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शरद बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. अशातच आता शरद केळकरने त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता शरद केळकरने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत खुलासा केला आहे, ज्यामध्ये तो पुन्हा एकदा अजय देवगणबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याआधी शरदने अजय देवगणबरोबर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ आणि ‘बादशाहो’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. आता अजयबरोबर चौथ्यांदा काम करण्यास उत्सुक असल्याचं शरदचं म्हणणं आहे.

आणखी वाचा- “… म्हणून तू काही झुलन गोस्वामी होणार नाहीस” व्हायरल फोटोंवरून नेटकऱ्यांनी अनुष्काला केलं ट्रोल

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाला, “मला वाटलं होतं की मी अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’चा भाग असेन. पण असं काही झालं नाही. मी या चित्रपटात दिसणार नाहीये अजयने मला या चित्रपटासाठी फोनच केला नाही.”

आणखी वाचा- “चित्रपटसृष्टीतील सर्वात बुलंद आवाज म्हणजे…” राज ठाकरेंकडून ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं भरभरून कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद केळकर पुढे म्हणाला, “मी त्याच्या ‘भोला’मध्ये दिसणार नाही पण आमचे काही वेगळे प्लान आहेत. लवकरच आम्ही वेगळा प्रोजेक्ट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होतो मात्र काही कारणाने ते शक्य होत नाहीये. पण आम्ही त्यावर काम करत आहोत. मला वाटतं पुढचं वर्षभर आम्ही त्यावर काम करू आणि हे खूप मजेदार असणार आहे.” अर्थात या मुलाखतीत शरदने आपल्या आगामी प्रोजेक्टच्या नावाचा खुलासा केलेला नसला तरीही आगामी काळात तो अजय देवगणसह काम करणार असल्याच्या वृत्ताची पुष्टी मात्र केली आहे.