बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहेत. विकी कौशल आली साराच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. नुकतंच सारा अली खानची आजी अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट बघितला. त्यानंतर शर्मिला यांनी साराला मेसेज केला आहे. काय आहे तो मेसेज?
चित्रपट बघितल्यानंतर शर्मिला यांनी मेसेज करत साराच्या कामाचे कौतुक केले आहे. सारानेही आजीच्या या कौतुकास्पद मेसेजचे आभार मानले आहेत. सारा म्हणाली आजीला वाटते सारा म्हणाली आजीला वाटते “माझी कॉमिक टायमिंग खूप चांगली आहे. सारा म्हणाली , “आजीला वाटते माझी कॉमिक टायमिंग खूप चांगली आहे. जेव्हा मी त्यांचा तो मेसेज वाचते तेव्हा माझे मन आनंदाने भरून येते. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”
हेही वाचा- शाहरुख खानच्या ‘जवानची’ बक्कळ कमाई; प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने जमवला इतक्या कोटींचा गल्ला
‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातील साराचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. अनेकांनी साराच्या कामाचे कौतुक केले आहे. सारांनी कौतुक करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. सारा म्हणाली, “जरा हटके जरा बचकेसाठी मला सर्व स्तरातून मिळालेला प्रतिसाद आणि माझ्या कामासाठी झालेलं खूप प्रेरणादायी आहे. माझे मित्र, कुटुंब, शुभचिंतक यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ आहे.”
हेही वाचा- ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर आक्षेप; म्हणाले, “अभिनेत्री टॅलेंटेड पण…”
जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ४ आठवड्यांत ८२.५३ कोटींचा व्यवसाय केला आहे. चौथ्या आठवड्यात चित्रपटाने ९.९९ कोटींची कमाई केली आहे.