‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखचा बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट यापूर्वी २ जूनला रिलीज होणार होता, परंतु काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या कमाईला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा- ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर आक्षेप; म्हणाले, “अभिनेत्री टॅलेंटेड पण…”
जवानाने प्रदर्शनाच्या दोन महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने त्याचे संगीत अधिकार टी-सीरीजला विकले आहेत. या करारात चित्रपट निर्मात्यांना ३६ कोटी मिळाले आहेत. अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाचे संगीतकार आहेत. याआधी त्यांनी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. यामध्ये विक्रम, मास्टर, मेरी आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा- विद्या बालनवर 5 स्टार हॉटेलसमोर आली होती भीक मागायची वेळ? अभिनेत्रीनं सांगितला ‘तो’ किस्सा
‘ई-टाइम्स’च्या रिपोर्ट्सनुसार जवान’ चित्रपटाचा टीझर ७ जुलै किंवा १५ जुलैला रिलीज होण्याची शक्यता आहे. शाहरुख खान आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली चेन्नईत ‘जवान’चा भव्य टीझर लॉन्च करणार आहेत. यासाठी काही खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येणार असून सर्वांच्या तारखा ठरल्यानंतर ७ किंवा १५ जुलैमधील एक तारीख निश्चित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- बहुचर्चित ‘जी ले जरा’ चित्रपटातून प्रियांका चोप्रा बाहेर? चर्चांना उधाण
जवानमध्ये शाहरुख खानशिवाय नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जवानची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली आहे. दरम्यान, शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटाबरोबर सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्येही कॅमिओ करणार आहे. त्यामुळे ‘पठाण’नंतर पुन्हा एकदा करण-अर्जुनची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.