‘बिग बॉस’ फेम शहनाझ गिलने आता बॉलीवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. शहनाझने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर शहनाझ बॉलीवूडच्या प्रत्येक पार्टी आणि कार्यक्रमात हजेरी लावताना दिसते. अलीकडेच ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आगामी ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला पोहोचली होती.

हेही वाचा : चेन्नईत डोसा खाताना अभिनेत्री सारा अली खानला येतेय ‘या’ दोन व्यक्तींची आठवण…

शहनाझचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवाजुद्दीनच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आलेल्या शहनाझला पाहून तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गोंधळ केला. या सगळ्या गडबडीत शहनाझला स्वत:ची कार ओळखता आली नाही आणि ती अनोळखी व्यक्तीच्या गाडीत बसायला निघाली होती. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊन शहनाझचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा फोन नंबर लीक? अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर दिली धमकी…

शहनाझचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पापाराझी तिला, “ही तुझी गाडी नाहीये,” हे सांगताना दिसत आहेत. पापाराझींनी चूक लक्षात आणून दिल्यावर शहनाझ भानावर येत स्वत:च्या गाडीच्या दिशेने जाताना दिसली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या या भोळेपणावर, “शहनाझ किती साधी आणि क्यूट आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहे. याउलट काहींनी यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : शाहिद कपूरच्या बहुचर्चित ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार रिलीज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शहनाझ गिलच्या ‘देसी वाईब्स विथ शहनाझ’ या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत असून या कार्यक्रमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, राजकुमार राव, कपिल शर्मा, अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे.