बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. कंगना समाजातील घडामोडींवर परखडपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते. अनेकदा कंगनाच्या राजकीय वक्तव्यांमुळे वादही निर्माण झालेला आहे. मुंबईतील कंगनाच्या घरावर कारवाई केल्यानंतर तिने शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी कंगनाबाबत एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच ‘टीव्ही ९’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगनाला नॉटी म्हणणाऱ्या राऊतांना तिच्या चित्रपटांबाबत प्रश्न विचारण्यात आला. “कंगनाचे चित्रपट पाहता का?” असा प्रश्न राऊतांना विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना राऊतांनी कंगना रणौतचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा>> “तुमच्या शहराला पाकिस्तान म्हणाली असती तर?” कंगना रणौतच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात “दिल्लीला…”

“कंगना रणौत एक उत्तम अभिनेत्री आहे. मी तिचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. कंगनाचे जवळपास सगळेच चित्रपच मी पाहिले आहेत. कंगनाचा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित असलेला ‘मणिकर्णिका’ हा चित्रपटही मी पाहिला आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा>> प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्यावर जीममध्ये हल्ला, चाकूने केले वार; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राऊतांना या मुलाखतीत कंगनाच्या मुंबईतील घरावर केलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे कंगनाच्या घरावर झालेल्या कारवाईचा कोणीही आनंद घेतलेला नाही. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. मुंबईत राहणारा आणि मुंबईवर प्रेम करणारा नागरीक हे सहन करणार नाही. उद्या जर दिल्लीला कोणी पाकिस्तान म्हटलं तरीही ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही तेव्हाही हेच बोलू. कारण, हा देश पाकिस्तान नाही”.