अनंत अंबानी व राधिका मर्चंट हे जोडपं येत्या १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहे. साखरपुडा, दोन प्री-वेडिंग सोहळे थाटामाटात साजरे केल्यानंतर आता अनंत-श्लोकाची मंगलघटिका समीप आली आहे. नुकताच अंबानींच्या घरी अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. याशिवाय पार्टीत येणाऱ्या प्रत्येकाने खास इंडो-वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं.

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे अंबानी कुटुंबीयांनी सुद्धा नटून थटून रॉयल लूकमध्ये एन्ट्री घेतली होती. यामध्ये अंबानींची मोठी सून श्लोका मेहताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. २००१ मध्ये करण जोहरचा ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामधल्या पूजा शर्माचा अर्थात करीना कपूर खानचा ‘बोले चुडिया’ लूक श्लोकाने रिक्रिएट केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : बेताची परिस्थिती, नृत्याची आवड अन्…; ‘मी होणार सुपरस्टार…’मध्ये सख्ख्या भावांनी मारली बाजी, मिळालं ५ लाखांचं बक्षीस

श्लोकाने कोरल क्रॉप ब्लाऊज, प्लाझो पँट आणि या ड्रेसवर मॅचिंग असा दुप्पटा घेत अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी खास लूक केला होता. श्लोकाची बहीण व फॅशन सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिया मेहता जाटियाच्या मते, हा लूक करीना कपूरने साकारलेल्या आयकॉनिक भूमिकेचं रिक्रिएशन होतं. करीनाचा ‘कभी खुशी कभी गम’मधील मूळ लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता.

“संगीत सोहळ्यासाठी आम्हाला काहीतरी खास आणि आयकॉनिक असं हवं होतं. यावर खूप चर्चा गेल्यावर आम्ही काही वर्षे मागे गेलो. तेव्हा मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या ‘बोले चुडिया’ या करीनाच्या लूकची भुरळ आम्हाला सर्वांनाच पडली. त्यामुळे हाच लूक श्लोकासाठी रिक्रिएट करण्याचा निर्णय घेतला” असं दियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : जुई गडकरी : मैत्रिणीबरोबर स्टुडिओ पाहायला गेली अन् अभिनेत्री होऊन बाहेर पडली…

सध्या करीना कपूर आपल्या कुटुंबीयांसह व्हेकेशनवर गेली असल्याने ती अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळे श्लोकाच्या या लूकचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत करीनाने भारावून जात “श्लोका तू खूप सुंदर दिसत आहेस” असं म्हटलं होतं. बेबोशिवाय डिझायनर मनीष मल्होत्राने देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर श्लोका मेहताच्या लूकचे फोटो शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Diya Mehta Jatia (@dmjatia)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत व राधिका येत्या १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या विवाहसोहळ्याला देश-विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस लग्नाचे सर्व विधी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. १४ जुलैपर्यंत लग्नाचे समारंभ सुरू असतील. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत बॉलीवूड कलाकारांशिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे भारतात उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.