बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रद्धाने नुकतीच तिची हेअरस्टायलिस्ट निकिता मेननच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. यावेळी ती मनसोक्त डान्स करताना दिसली. या कार्यक्रमांमधील तिचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

श्रद्धाने या कार्यक्रमात केशरी आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. त्याबरोबर तिने पांढरे स्निकर्स घातले होते. तिने निकिता मेननच्या या खास कार्यक्रमात मनसोक्त डान्स केला. श्रद्धा या व्हिडीओत खूपच सुंदर दिसत आहे.

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

इतकंच नाही तर श्रद्धाने तिच्या हातावरची मेहंदीही दाखवली. तिचा डान्स व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. श्रद्धाने खूप सुंदर डान्स केला आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती चाहत्यांबरोबर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. इतकंच नाही तर अनेकदा ती चाहत्यांच्या कमेंट्सला उत्तरंही देत असते. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने तिची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या सूनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिचा मराठमोळा लूक चांगलाच चर्चेत होता.