अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी २०२४ हे वर्ष खूप खास ठरले. याच वर्षी तिच्या ‘स्त्री २’ या सिनेमाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. याचवर्षी तिने तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबरच्या ब्रेकअपच्या बातम्यांना खोट ठरवत त्याच्याबरोबरच्या डेटिंगचे फोटो पोस्ट केले होते. यामुळे गेले वर्ष तिचे व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यात खास ठरले. श्रद्धा यशाचे शिखर गाठत असले तरी ती आजही तिच्या कुटुंबीयांबरोबरच राहते. ‘स्क्रीन’च्या लॉन्च इव्हेंटदरम्यान श्रद्धाने तिच्या घरातील जवळच्या व्यक्तींबद्दल व्यक्त झाली.

स्क्रीनच्या व्यासपीठावर श्रद्धा म्हणाली, “मी अजूनही माझ्या आई-वडिलांबरोबर आणि माझ्या पाळीव प्राण्यांसह राहते, आणि खरंच हे खूप धमाल आहे,” कपूर कुटुंबाबद्दल अधिक बोलताना श्रद्धा म्हणाली, “माझ्या आई-वडिलांनी माझं यश-अपयश दोन्ही पाहिलं आहे. त्यांनी मला एक अप्रतिम सपोर्ट सिस्टीम दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

श्रद्धाने पुढे तिच्या घरी असलेल्या नियमांबद्दल सांगितले. ती म्हणाली, “आमच्या घरी एक नियम आहे. जेव्हा आम्हाला एकमेकांपासून थोडा वेळ स्वतंत्र हवं असतं, (आमची स्पेस हवी असते) तेव्हा आम्ही आमच्या दाराबाहेर ‘डू नॉट डिस्टर्ब’चं चिन्ह लावतो.” त्या चिन्हासंदर्भातल्या नियमांबद्दल ती पुढे म्हणाली, “जेव्हा ‘डू नॉट डिस्टर्ब’चं चिन्ह लावलेलं असतं, तेव्हा फक्त काही इमर्जंन्सी असल्यावरच माझ्या कुटुंबियांना माझ्या खोलीत येण्याची परवानगी आहे. त्यावेळी दारावर जोरजोरात ठोठावणं, ओरडणं चालतं… पण इतरवेळी आम्ही असं करत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूरने सांगितले होते की, तिने काही नवीन चित्रपट साइन केले आहेत. मात्र, निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत ती याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही. श्रद्धाने नुकताच ‘स्त्री २’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला. हा चित्रपट २०१८ च्या तिच्या हिट हॉरर-कॉमेडी ‘स्त्री’चा सिक्वेल होता, ज्यामध्ये ती राजकुमार रावबरोबर झळकली होती.