मराठीसह बॉलीवूड मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते.

श्रेयसला गेल्या महिन्यांत १४ डिसेंबर रोजी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढ्या मोठ्या संकटातून घरी परतल्यावर आता हळुहळू श्रेयसच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यावर अभिनेत्याने त्याची पत्नी, डॉक्टर व हितचिंतकांचे पोस्ट शेअर करत आभार मानले होते. आज आजारपणानंतर पहिल्यांदाच श्रेयस त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माध्यमांसमोर आला होता.

हेही वाचा : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळाल्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “मराठा लढतो तेव्हा…”

श्रेयसने अगदी साध्या पद्धतीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी सगळ्या पापाराझींनी त्याला भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. वाढदिवस साजरा करण्यापूर्वी श्रेयस त्याच्या चाहत्यांना उद्देशून म्हणाला, “परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करेन की, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. कारण, आपलं आरोग्य चांगलं नसेल तर, काय होतं हे मी स्वत: भोगलंय. जे माझ्याबरोबर झालं ते इतर कोणाबरोबरही होऊ नये. त्यामुळे, परमेश्वरा नेहमी सगळ्यांना चांगलं आरोग्य दे!”

हेही वाचा : “निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर…”, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यावर किरण मानेंची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्रेयस वाढदिवस साजरा करतानाचा हा व्हिडीओ फिल्मीग्यान या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत श्रेयसच्या चाहत्यांना त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.