सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी फार चांगली कमाई केली नव्हती, पण दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी यासारखे कलाकारही झळकले आहेत. पलक तिवारीची आई व अभिनेत्री श्वेता तिवारीने लेकीच्या परफॉर्मन्सबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सहावीत झालेलं प्रेम, तिने चार वेळा नकार दिला अन्…; ‘अशी’ आहे वरुण धवन नताशा दलालची लव्ह स्टोरी

श्वेता तिवारीने ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. श्वेता म्हणाली की तिला तिच्या मुलीचा नेहमीच अभिमान वाटतो. श्वेतालाही आपल्या मुलीच्या बोलण्याच्या आणि राहण्याच्या पद्धतीचाही अभिमान वाटतो. श्वेता म्हणाली, “मला आशा आहे की प्रत्येकजण माझ्या मुलीला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देईल. मी तिचा चित्रपट दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये पाहिला आणि मला आशा आहे की तुम्हीही पाहाल. मला तिचा नेहमीच अभिमान वाटतो, मग तो चित्रपट असो की आणखी काही. ती एक प्रेमळ मुलगी आहे. जेव्हा जेव्हा मी तिचे बोलणे किंवा वागणे पाहते तेव्हा मला तिचा अभिमान वाटतो.”

नीता अंबानींचे सौंदर्य फुलवणारा मेकअप आर्टिस्ट नक्की आहे तरी कोण? पगार ऐकून व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलक तिवारीने ‘बिजली बिजली’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने ‘अंतिम’ चित्रपटात सलमान खानसोबत बॅक स्टेजवरही काम केलं होतं. ‘किसी का भाई किसी की जान’ हा तिचा पहिलाच चित्रपट असून तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. इतर कलाकारांसह पलकच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.