बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या खूपच चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘योद्धा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथची सुपरस्टार राशी खन्ना हिची प्रमुख भूमिका आहे. दरम्यान, सिद्धार्थ व राशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोलही केले आहे.

सिद्धार्थ व राशी सध्या योद्धा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनदरम्यानचा दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये राशी सिद्धार्थच्या दंडाला पडकून चालताना दिसत आहे. एवढेच नाही, तर पुढेही राशी सिद्धार्थचा हात पकडूनच चालताना दिसली. हा व्हिडीओ बघून कियाराचे चाहते खूपच भडकले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत सिद्धार्थ व राशीला नवरा-बायकोसारखे वागू नका, असे म्हणत ट्रोल केले आहे.

एकाने कमेंट करीत लिहिले, “दोघेही जोडप्यासारखे का वागत आहेत?” दुसऱ्याने “हे ​​अजिबात चांगले दिसत नाही”, अशी टिप्पणी केली. तर काही नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीचाही उल्लेख केला. एकाने कमेंट करीत लिहिले, “घरी पोहोच. कियारा लाटणं घेऊन तयार असेल.” तर दुसऱ्याने, “कियारा कोपऱ्यात बसून रडत असेल,” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- “माझी नवीन गाणी पाठवतो…”, जॉन सीनाने गायलेलं ‘ते’ गाणं ऐकून शाहरुख खानची प्रतिक्रिया, म्हणाला…

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीने २०२० मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तब्बल सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

हेही वाचा- ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर सिद्धार्थ नुकताच ‘इंडियन पुलिस फोर्स’ वेब सीरिजमध्ये झळकला. त्यामध्ये त्याच्याबरोबर शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आता येत्या १५ मार्चला त्याचा ‘योद्धा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात तो भूदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.