अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज विवाहबंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. याच ठिकाणी दोघांच्या संगीतचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या संगीतासाठी सूर्यगड पॅलेसमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

मुंबईत घर, गाड्या अन्…; कियारा अडवाणीपेक्षा तिप्पट श्रीमंत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, जाणून घ्या दोघांच्या संपत्तीबद्दल

सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी सूर्यगड पॅलेस बूक करण्यात आला आहे. या ठिकाणचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये हा पॅलेस गुलाबी व पिवळ्या लाइट्सनी उजळून निघाला आहे, असं दिसतंय. तसेच मोठ्या प्रमाणात म्युझिक ऐकू येत आहे. दोघांच्या लग्नासाठी हे हॉटेल सजवण्यात आलं आहे. लग्न व लग्नपूर्व सर्व कार्यक्रम याच हॉटेलमध्ये होतील.

सिद्धार्थ व कियारा आपल्या कुटुंबीयांसह शनिवारी जैसलमेरच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. तसेच त्यांचे कुटुंबीय व इतर पाहुणेही जैसलमेरला येताना दिसले होते. बॉलिवूडमधून मनीष मल्होत्रा, करण जोहर, शाहिद कपूर, मीरा राजपूत आणि जुही चावला लग्नासाठी जैसलमेरला पोहोचले आहेत. याशिवाय कियाराची बालपणीची मैत्रीण इशा अंबानीदेखील लग्नाला पोहोचली आहे.

या दोघांनी लग्नात नो फोन पॉलिसी ठेवल्याने फोटो, व्हिडीओ अजून समोर आलेले नाहीत. अशातच त्यांचा डान्स करतानाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जोडप्याच्या लग्नात नो फोन पॉलिसी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कुणालाही लग्नाचे फोटो व्हिडीओ काढता येणार नाही. लग्नाच्या दोन दिवसांनी ते मुंबईत रिसेप्शन देतील, असंही म्हटलं जातंय.