बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी चर्चेत असते. सोनाक्षी कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सोनाक्षीने मुंबईत नवीन घर घेतले आहे. या घराचे फोटो सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे सोनाक्षीने चाहत्यांना तिच्या नवीन घराची माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या नवीन ड्रीमी हाऊससोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षी घरात नवीन फर्निचर सेट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहिले की, “खूप कठीण, झाडे, भांडी, दिवे आणि गाद्या आणि प्लेट्स आणि कुशन आणि खुर्च्या, टेबल, चमचे, सिंक आणि डब्याने डोके फिरवलं आहे. घर बांधणे सोपे नाही.” सोनाक्षीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर कमेंट करून चाहते तिचे नवीन घरासाठी अभिनंदन करताना दिसत आहेत.

सोनाक्षी सिन्हाने यापूर्वी २०२१ मध्ये वांद्रे येथे 4BHK घर खरेदी केले होते. आता तिने आणखी एक नवीन घर घेतले आहे. त्याअगोदर सोनाक्षी तिच्या आई-वडिलांबरोबर त्यांच्या घरी राहत होती. शत्रुघ्न सिन्हा यांचे मुंबईत ‘रामायण’ नावाचे आलिशान घर आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नापूर्वी हे घर विकत घेतले होते. सोनाक्षी सिन्हा आणि तिचे भाऊ लव आणि कुश याच घरात वाढले. शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहतात. सोनाक्षीचे नवीन घर खूपच सुंदर आहे. सोनाक्षीच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीतून मुंबईचे वांद्रे-वरळीचे सी-लिंक स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा- Video : भर कार्यक्रमात विकी कौशलने कतरिनाला विचारलेलं ‘मुझसे शादी करोगी?’ तिचं उत्तर ऐकताच सलमान खानने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती ‘दहाड’ या वेब सीरिजनंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत आहेत.